'अबकी बार ट्रम्प सरकार'; अमेरिकेतील भारतीयांचा राष्ट्राध्यक्षांना रेकॉर्ड तोड पाठिंबा

'अबकी बार ट्रम्प सरकार'; अमेरिकेतील भारतीयांचा राष्ट्राध्यक्षांना रेकॉर्ड तोड पाठिंबा

गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता

  • Share this:

वॉशिंग्टन, 20 जुलै : अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात राष्टाध्यक्ष पदाच्या निवडणुका होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सध्या अमेरिकेत उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका डिजिटल रॅलीचं आयोजन केलं होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या केलेल्या हिंदूज4ट्रम्प या रेकॉर्ड संख्यात तब्बल 1 लाखांहून अधिक भारतीय-अमेरिकेन नागरिक सहभागी झाले. राष्ट्राध्यक्ष पदासाठी ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बाइडेन मैदानात आहेत.

भारतीय-अमेरिकन पहिल्यांदा रिपब्लिकन उमेदवाराच्या समर्थनार्थ

ट्रम्प विक्ट्री इंडिया अमेरिकन फायनान्स कमिटीचे उपाध्यक्ष अल मैसन यांनी रविवारी डिजिटल रॅलीला संबोधित करीत असताना म्हणाले की - गेल्या 6 महिन्यांपासून निवडणुकीच्या प्रचारानुसार 1992 पासून राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक उमेदवारासाठी मतदान करणारे भारतीय-अमेरिकन पहिल्यांदा रिपब्लिकन उमेदवाराचं समर्थन करीत आहेत. मॅसन यांनी हिंदूज4ट्रम्प या डिजिटल रॅलीला संबोधित केले.

हे वाचा-चीनवर दुहेरी संकट; जगातील सर्वात मोठा पूल विस्फोटकांनी उडवला

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भारतीय-अमेरिकन मतदारांचं प्रेम

अमेरिकन4हिंदू यांच्या एका वक्तव्यानुसार – विविध सोशल मीडियावर तब्बल 30000 लोकांनी रॅलीचे थेट प्रक्षेपण पाहिलं आणि त्यानंतर तब्बल 70000 लोकांनी हे ऑनलाइन पाहिले. मॅसन यांनी सांगितले की – भारतीय-अमेरिकन मतदारांचा रिपब्लिकन पार्टीकडे कल वाढत आहे. कारण ते सर्व राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर प्रेम करतात. गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भारतीयांना भेट दिली आहे. त्यामुळे बऱ्या अंशी डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा चांगली करण्यामागे मोंदीच्या या भेटी फायदेशीर ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यावेळी मोदींनी अबकी बार ट्रम्प सरकारचा नारा दिला होता. त्यामुळे यंदा अमेरिकेत कोणाचं सरकार येणार हे पाहणे औत्सुक्याने ठरणार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 20, 2020, 3:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading