इटलीत कुत्र्याच्या शुश्रूषेसाठी महिलेला मिळाली रजा

इटलीत कुत्र्याच्या शुश्रूषेसाठी महिलेला मिळाली रजा

कुकुओला ही आपल्या कुटुंबाचीच सदस्य असून तिची देखभाल करण्यासाठी रजा हवी असल्याचं त्यांनी अर्ज केला आणि डॉक्टरांचं सर्टीफिकीटही जोडलं. बरीच चर्चा केल्यावर विद्यापीठानं अॅनांना रजा मंजूर केली.

  • Share this:

15 आॅक्टोबर : ऑफिसमधून रजा मिळणं हे तसं अवघड. पण इटलीत एका महिलेनं प्रयत्न केला आणि तिला चक्क आपल्या लाडक्या कुत्र्याची आजारपणात सेवा करण्यासाठी आठवडाभराची सुटी मिळाली.

इटलीत सध्या चर्चा सुरू आहे ती सापिएंझा विद्यापीठातल्या अॅना यांची. कारण आपल्या आजारी कुत्र्याच्या सुश्रृषेसाठी अॅना यांना आठवडाभराची रजा मिळालीय. या रजेची चर्चा सध्या जगभर होतेय. कुठल्याही ऑफिसमध्ये रजा मिळणं तसं अवघड असतं. मात्र प्राणीमित्र संघटनेचा दबाव आणि विद्यापीठानं दाखवलेलं उदार धोरण यामुळं चक्क पाळीव प्राण्यांच्या सेवेसाठी रजा देणारा हा निर्णय झालाय.

अॅना या ला सापिएंझा विद्यापीठात लॅब्रेरियन आहेत. गेल्या 12 वर्षांपासून त्या आपल्या लाडक्या कुकुओलाबरोबर राहतात. कुकुवर त्यांचं जीवापाड प्रेम.तिच्या शिवाय राहणं याचा विचारही त्या करू शकत नाहीत. काही दिवसांपूर्वी आजारी असलेल्या कुकुला ब्रेस्ट ट्युमर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.तिचं तातडीनं ऑपरेशन करण्याचा सल्लाही दिला.आजारपणात कुकुची देखभाल कोण करणार या चिंतेनं अॅना यांना ग्रासलं आणि त्यांनी रजेचा अर्ज केला.

कुकुओला ही आपल्या कुटुंबाचीच सदस्य असून तिची देखभाल करण्यासाठी रजा हवी असल्याचं त्यांनी अर्ज केला आणि डॉक्टरांचं सर्टीफिकीटही जोडलं. बरीच चर्चा केल्यावर विद्यापीठानं अॅनांना रजा मंजूर केली.हा निर्णय इटलीतल्या प्राणीप्रेमी संघटेनेचा विजय असल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2017 10:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading