News18 Lokmat

आईला काहीच आठवत नाही, तरीही मुलगा देतोय आनंदाचे क्षण

सगळ्यांकडे एकदम अनोळखी नजरेनं बघते. फक्त एकदाच ती मनापासून हसते. कधी ठाऊकेय? जेव्हा तिचा मुलगा तिचे फोटो काढतो. ती गोडसं स्माइल देते.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 8, 2017 05:15 PM IST

आईला काहीच आठवत नाही, तरीही मुलगा देतोय आनंदाचे क्षण

08 डिसेंबर : त्या आईला काहीच आठवत नाहीय. ती आपल्या मुलालाही ओळखत नाही. सगळ्यांकडे एकदम अनोळखी नजरेनं बघते. फक्त एकदाच ती मनापासून हसते. कधी ठाऊकेय? जेव्हा तिचा मुलगा तिचे फोटो काढतो. ती गोडसं स्माइल देते. हे गेली तीन वर्ष चाललंय.

ही गोष्ट आहे इटलीमधली. टोनी लुसियानीची आई बाथरूममध्ये पडली. कंबरेचं हाड मोडलं. अंथरुणाला खिळली. सगळ्यांनी टोनीला सल्ला दिला, आईला वृद्धाश्रमात घाल. पण टोनीनं नकार दिला. पुढे आईला हळूहळू डिमेन्शियानं ग्रासलं. ती टोनीलाही ओळखेना.

टोनी स्वत: चित्रकार आणि फोटोग्राफर आहे. घरूनच आपलं काम करतो. एक दिवस तो काम करत असताना त्याची आई उत्सुकतेनं बघत असताना त्यानं पाहिलं. आणि आईचा फोटो त्यानं क्लिक केला. तो इस्टाग्रामवर टाकला. त्याला भरपूर लाइक्स मिळाल्या. त्यानंतर आईचे वेगवेगळे मूडस कॅमेऱ्यात कैद करणं हा टोनीचा छंदच बनला.

Loading...

Selfie with Him #dementia #alzheimers #mentalhealth #mentalhealthawareness #age #mamma #tonyluciani

A post shared by Tony Luciani (@ynotphoto256) on

टोनी बरीच वर्ष घरापासून दूर होता. अगदी त्याचे वडील आणि भाऊ गेले, तेव्हाही  तो आईसोबत नव्हता. पण आता त्यानं आपल्या आईची साथ सोडली नाहीय. लहान मूल झालेल्या आईला ते जपतोय.

टोनीनं आईचे फोटोज Mama: in the meantime या नावाच्या सीरिजनं इन्स्टाग्रामवर टाकलेत. फोटो फक्त बघण्यासारखे नाहीत, त्यापासून बरंच काही शिकण्यासारखंही आहे. हे फोटोज प्रत्येकाला अंत:र्मुख करून जातात.

Game of hide & seek. #alzheimers #dementia #mamma #tonyluciani #portrait #age

A post shared by Tony Luciani (@ynotphoto256) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2017 05:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...