भारतानं तात्काळ आणि बिनशर्त सैन्य मागे घेण्याची ड्रॅगनची मागणी

भारतानं तात्काळ आणि बिनशर्त सैन्य मागे घेण्याची ड्रॅगनची मागणी

'ग्लोबल टाईम्स' या चिनी सरकारच्या मुखपत्रातून ड्रॅगननं भारताला धमकी दिलीय

  • Share this:

06 जुलै : भारत आणि चीन यांच्यात भूतानमधील विवादित डोकलाम भागावरून वाद सुरू आहे. एकीकडे भारताने या भागातून लष्कर त्वरित मागे घ्यावं अशी मागणी चीनने केलीय, तर दुसरीकडे भारताने या भूभागावर भूतानचा दावा मान्य करत त्यांच्या वतीने चीनला तिथेून माघार घ्यायला सांगितलंय. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडलेत.

'ग्लोबल टाईम्स' या चिनी सरकारच्या मुखपत्रातून ड्रॅगननं भारताला धमकी दिलीय, काय म्हटलंय ते पाहूया...

धमकी 1 - सिक्कीमच्या मुद्द्यावर चीन आपली भूमिका बदलू शकतो

धमकी 2 - भूतान, सिक्कीममध्ये भारतविरोधी चळवळ सुरू होऊ शकते, त्याचा ईशान्य भारतावर परिणाम होऊ शकतो

धमकी 3 - नवी दिल्लीची अरेरावी वाढतेय, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल

धमकी 4 - भारत भूतानवर अत्याचार करतोय, त्यामुळे दोन्ही देशांतले मतभेद वाढतायत

धमकी 5 - हिमालयाच्या कुशीतल्या छोट्या देशांवर भारताकडून होणाऱ्या अत्याचाराकडे जगानं लक्ष द्यायला हवं

धमकी 6 - भूतानचं राजकीय, संरक्षणात्मक सार्वभौमत्व जपण्यासाठी चीननं जागतिक समुदायाचं नेतृत्व करायला हवं

धमकी 7 - भूतानी नागरिकांच्या इच्छांचं उल्लंघन करणारे भारत, भूतानमधले अनुचित करार रद्द व्हायला हवेत

First Published: Jul 6, 2017 09:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading