'या' देशात लष्कराकडून कुटुंबातील महिलांवरच बलात्कार करण्याची होतेय सक्ती, UN चा दावा

'या' देशात लष्कराकडून कुटुंबातील महिलांवरच बलात्कार करण्याची होतेय सक्ती, UN चा दावा

इथिओपिया (Ethiopia) देशातील तिग्रे प्रांतात (Tigray Region) लष्कराकडून महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात आहेत. तसंच सामूहिक बलात्काराच्या (Gang Rape) घटनाही समोर येत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

संयुक्त राष्ट्र, 27 मार्च : संयुक्त राष्ट्राने (UN) गुरुवारी धक्कादायक खुलासा केला आहे. इथिओपिया (Ethiopia) देशातील तिग्रे (Tigray) प्रांतात कुटुंबीयांतील महिलांवरच बलात्कार करण्याची सक्ती केली जात असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने दिली आहे. इथिओपिया देशातील तिग्रे प्रांतात 500 हून अधिक बलात्काराची (more than 500 rapes) प्रकरणं समोर आली आहेत. हा आकडा यापेक्षा कितीतरी मोठी असू शकतो, असा इशाराही संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. त्यामुळे मानवाधिकार आणि महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

इथिओपिया देशातील तिग्रे प्रांतात लष्कराकडून (Army raped on woman) महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात आहेत. तसंच सामूहिक बलात्काराच्या घटनाही समोर येत आहेत. इतकंच नव्हे तर कुटुंबातील सदस्यांना स्वतः च्या कुटुंबातील महिलांवर बलात्कार करण्याची सक्ती केली जात आहे. याबाबतची माहिती देताना एका पीडित महिलेनं सांगितलं की, 'आमच्यावर सैनिकांनी बलात्कार केला आहे. तर काही महिलांवर सामूहिक बलात्कारही केला जात आहे. एवढंच नव्हे तर कुटुंबातील सदस्यांसमोर बलात्कार केले जात आहे. त्याचबरोबर परिसरातील लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.'

याबाबत युएनने सांगितलं की, मेकेले, आदिग्रीट, वुकरो, शायर आणि एक्सम या पाच वैद्यकीय केंद्रात कमीतकमी 516 बलात्कारांची नोंद करण्यात आली आहे. पण हा आकडा प्रत्यक्षात खूपच मोठा असून शकतो असा अंदाज युएनने लावला आहे.  इथिओपियाचे युएनचे राजदूत ताए एत्सेस्सेलसी एमडे यांनी सांगितलं की, 'इथिओपिया देशात होत असलेल्या लैंगिक हिंसाचाराबाबच्या आरोपांची दखल सरकार गांभीर्याने घेत आहे. तसंच याप्रकरणी कसून तपास सुरू करण्यात आला आहे.

(वाचा-नागपूर हादरलं! आई-वडील कामाला गेल्याचं पाहून 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार)

वृत्तसंस्था रॉयटर्सला विविध साक्षीदारांनी सांगितलं की, शेजारच्या इरिट्रियातील सैनिकांनी संघर्षाच्या वेळी येथील नागरिकांवर सामूहिक बलात्कार केले आहेत. तसंच त्यांची घरं आणि पिकंही लुटली आहेत. यापूर्वी तिग्रे मध्ये झालेल्या हिंसाचारात हजारो लोकांचा बळी गेला आहे. तसंच डोंगराळ भागात राहणाऱ्या हजारो लोकांना घरं सोडून दुसऱ्या भागात स्थलांतर करावं लागलं आहे. नोव्हेंबर महिन्यात तिग्रेमध्ये सत्तापालट झाला, तेव्हापासून सरकारी सैन्य आणि त्या प्रदेशातील माजी सत्ताधारी पक्ष असणाऱ्या तिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट यांच्यात युद्ध चालू आहे.

Published by: News18 Desk
First published: March 27, 2021, 5:15 PM IST

ताज्या बातम्या