S M L

चीनमध्ये एका स्नो टायगर मादीला झाले तब्बल 4 बछडे !

चीनच्या जिनान वाईल्डलाईफ वर्ल्डमध्ये निसर्गानं किमयाच केली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण एका स्नो टायगर मादीला एक नाही, दोन नाही तर तब्बल ४ बछडे झालेत.

Renuka Dhaybar | Updated On: May 26, 2018 09:32 PM IST

चीनमध्ये एका स्नो टायगर मादीला झाले तब्बल 4 बछडे !

26 मे : चीनच्या जिनान वाईल्डलाईफ वर्ल्डमध्ये निसर्गानं किमयाच केली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण एका स्नो टायगर मादीला एक नाही, दोन नाही तर तब्बल ४ बछडे झालेत. स्नो टायगरची संख्या आधीच फार कमी आहे. त्यामुळे या 4 बछड्यांच्या येण्याने सगळीकडे आनंदी आनंद आहे असं म्हणायला हरकत नाही.

दर एक लाख नेहमीच्या वाघांनंतर एक स्नो टायगर जन्माला येतो. त्यात या मादीला ४ बछडी झाली आहेत. तसं पहायला गेलं तर वाघ हा एकटा राहणारा प्राणी आहे. पण जन्म झाल्यापासून हे ४ बछडे एकत्रच राहतात, एकमेकांचा आधार घेऊन झोपतात. भरपूर खेळतातही.

जन्माला येऊन एकच महिना झालाय, त्यामुळे ते लवकर थकतात आणि बराच वेळ झोप काढतात. या प्राणी संग्रहालयात येणाऱ्या लहान मुलांना मात्र या वाघांचं अधिक आकर्षण आहे. काचेवर नाक घासताना पाहून या लहानग्यांना अधिकच गंमत वाटते.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2018 09:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close