मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोरोनानंतर अमेरिकेत आणखी एक संकंट, तब्बल 640 लोकांना झाली विचित्र आजाराची लागण

कोरोनानंतर अमेरिकेत आणखी एक संकंट, तब्बल 640 लोकांना झाली विचित्र आजाराची लागण

अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या विज्ञान आणि इंजीनियरिंग केंद्राकडून (सीएसएसई) जारी केलेल्या संख्येनुसार अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत  5521303 लोकांना संसर्ग झाला असून 175350 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राजीलमध्ये आतापर्यंत 3532330 लाख लोगांना याची लागण झाली असून 113318 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या विज्ञान आणि इंजीनियरिंग केंद्राकडून (सीएसएसई) जारी केलेल्या संख्येनुसार अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 5521303 लोकांना संसर्ग झाला असून 175350 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राजीलमध्ये आतापर्यंत 3532330 लाख लोगांना याची लागण झाली असून 113318 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत 1 लाख 48 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यात अमेरिकेत आता आणखी एक आजार वेगाने पसरत आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

वॉशिंग्टन, 26 जुलै : जगभरात 1 कोटी 59 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील तब्बल 42 हजार 50 रुग्ण हे अमेरिकेतील आहे. अमेरिकेत कोरोनानं थैमान घातले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत 1 लाख 48 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यात अमेरिकेत आता आणखी एक आजार वेगाने पसरत आहे. अमेरिकेतील 11 राज्यांतील 640हून अधिक लोकांना सायक्सोस्पोरा (cyclospora) नावाचा आजार झाला आहे.

सायक्सोस्पोरा हा आजार पॅकेटमध्ये विकल्या जाणाऱ्या सॅलडमुळे होतो. पॅकेट सॅलडमध्ये आइसबर्ग लेटस, गोभी आणि गाजर असतात. हे सॅलड खाल्यानंतर तब्बल 641 जणांना या विचित्र आजाराची लागण झाली आहे. यातील 37 जणांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले आहे.

वाचा-44 जणांनी कोरोनाला हरवलं जोमात, झिंगाट गाण्यावर तुफान डान्सचा VIDEO

सूक्ष्म परजीवींशी संबंधित हा सायक्लोस्पोरियासिस रोगाची भूक न लागणे, पोट फुगणे, मळमळ, सौम्य ताप, थकवा आणि अतिसार अशी लक्षणं आहेत. ही लक्षणं साधारणत: पॅकेटमधील अन्न किंवा पाणी प्यायल्यानंतर एका आठवड्यांनी दिसतात. ज्या सॅलडमुळे हा आजार पसरला ती उत्पादने इलिनॉयच्या स्ट्रीमवुडमधील फ्रेश एक्सप्रेस (Fresh Express) कंपनीने केली होती.

वाचा-8 महिन्यांनंतर उत्तर कोरियात घुसला कोरोना! पहिला रुग्ण सापडताच किम जोंग घाबरले

मे आणि जुलै महिन्यादरम्यान जवळपास डझनभर राज्यांमध्ये ही प्रकरणे नोंदली गेली. ही प्रकरणं जॉर्जिया, आयोवा, इलिनॉय, कॅन्सस, मिनेसोटा, मिसुरी, नेब्रास्का, उत्तर डकोटा, पेनसिल्व्हेनिया, दक्षिण डकोटा आणि विस्कॉन्सिन येथे नोंदवली गेली आहेत. फेडरल अधिकारी लोकांना सल्ला देत आहेत की, लोकांनी हे सॅलड खाऊ नये. कारण सध्या सॅलड उत्पादनांचा शोध सुरू आहे.

वाचा-कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी चीनचा खास डायट! तुम्ही करा आहारात सामील

अन्नांद्वारे जन्मलेल्या इतर आजारांप्रमाणे सायक्सोस्पोरामध्ये डीएनए-फिंगरप्रिंट तंत्रज्ञान नाही ज्यामुळे याचे उत्पादन कोठे झाले, हे शोधता येऊ शकेल. सध्या एफडीए प्रत्येक पॅकेट सॅलड विकणाऱ्या दुकानांचा शोध घेत आहे.

First published:

Tags: Corona