अरे देवा! Imran Khan यांनी स्वतःला म्हटलं 'गाढव'; लोक म्हणाले, खरंच...VIDEO VIRAL
अरे देवा! Imran Khan यांनी स्वतःला म्हटलं 'गाढव'; लोक म्हणाले, खरंच...VIDEO VIRAL
हा व्हिडिओ आता ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला जात आहे. इम्रान यांच्या या वक्तव्याचा लोक आनंद घेत आहेत. बरेच लोक म्हणत आहेत की, इम्रान यांना स्वतःचे सत्य माहीत आहे.
नवी दिल्ली, 6 मे : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पदावरून हटवल्यापासून ते सातत्याने वादात (Imran Khan Controversy) आहेत. कधी स्वत:वर झालेल्या आरोपांमुळे तर कधी सत्तेच्या पतनासाठी कोणालातरी आरोपी ठरवून ते नेहमी चर्चेत असतात. आता इम्रान खान यांचा असा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये त्यांनी इतर कोणाला नाही तर, स्वतःलाच 'गाढव' म्हटलंय (Imran Khan Donkey Video).
काय म्हणाले इम्रान?
सध्या इम्रान खान त्यांना संधी मिळताच शाहबाज शरीफ यांना शिव्या देत आहेत. आता एका व्हिडिओमध्ये ते स्वत:लाच गाढव म्हणत आहेत. इम्रान खान यांच्या एका जुन्या मुलाखतीची क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते व्हिडिओमध्ये काय बोलतायत यावर लोकांना विश्वास बसत नाही. यामध्ये इम्रान खान म्हणताहेत, 'मी देखील ब्रिटीश सोसायटीचा एक भाग होतो. त्यांनी माझं स्वागत केलं. फार कमी लोकांना ब्रिटीश सोसायटीनं असं स्वीकारलं आहे. पण मी ते कधीच माझं घर मानलं नाही. मी पाकिस्तानी आहे. मला हवे ते करू शकतो... पण मी इंग्रज होऊ शकत नाही. गाढवावर रेषा मारल्या तर तो झेब्रा होत नाही. गाढव गाढवच राहते. हा व्हिडिओ पहा...
लोक चेष्टा-मस्करी करत आहेत
हा व्हिडिओ आता ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला जात आहे. इम्रान यांच्या या वक्तव्याचा लोक आनंद घेत आहेत. बरेच लोक म्हणत आहेत की, इम्रान यांना स्वतःचे सत्य माहीत आहे. तर, काही लोक असे म्हणत आहेत की, इम्रान पहिल्यांदाच प्रामाणिक दिसत आहेत.
हे वाचा - पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचे व्हिडीओ होणार लीक; 3 तर अत्यंत आक्षेपार्हपरकीय कटाचे वक्तव्यही व्हायरल
या व्हिडिओपूर्वीही इम्रान खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकवेळा लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. अलीकडेच त्यांनी आपली सत्ता गमावण्यामागे परकीय कारस्थानाचा ठपका ठेवला होता.
Published by:Digital Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.