Home /News /videsh /

आधी पंतप्रधान पद गेलं, आता हा आरोप; Imran Khan यांच्या अडचणींत भर पडणार?

आधी पंतप्रधान पद गेलं, आता हा आरोप; Imran Khan यांच्या अडचणींत भर पडणार?

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sarif) यांनी पदच्युत पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर दुबईत (Dubai) 14 कोटी रुपयांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांसह मौल्यवान तोशाखाना भेटवस्तू विकून राष्ट्रीय तिजोरीचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे.

पुढे वाचा ...
    इस्लामाबाद, 17 एप्रिल : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sarif) यांनी पदच्युत झालेल्या इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर दुबईत (Dubai) 14 कोटी रुपयांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांसह मौल्यवान तोशाखाना भेटवस्तू विकून राष्ट्रीय तिजोरीचं नुकसान केल्याचा आरोप केला आहे. देशाच्या कायद्यानुसार परदेशातील मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू देशाच्या सरकारी तिजोरीत ठेवावी. 'द न्यूज इंटरनॅशनल'ने शुक्रवारी दिलेल्या वृत्तानुसार, येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी ज्येष्ठ पत्रकारांशी झालेल्या बैठकीदरम्यान शाहबाज यांनी हा आरोप केला. "इम्रान खान यांनी तोशाखानाकडून भेटवस्तू घेतल्या आणि त्या दुबईमध्ये 14 कोटी रुपयांना (US$7.6 दशलक्ष) विकल्या," असं पंतप्रधान शाहबाज म्हणाले. मौल्यवान भेटवस्तूंमध्ये हिऱ्यांचे दागिने, बांगड्या, घड्याळे आणि सेट यांचा समावेश आहे.'' शाहबाज यांनी सांगितलं की, त्यांनाही एकदा एक घड्याळ मिळालं होतं, जे त्यांनी तोशाखान्यात जमा केलं होतं. नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणाले, "मला काहीही लपविण्याची गरज नाही." खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ सरकार तोशाखान्यातून ठेवलेल्या भेटवस्तूंचा तपशील सांगण्यास संकोच करत होते. हे वाचा - 6 जणं 13 दिवस निर्जन ठिकाणी अडकले, एका बाटलीने केला चमत्कार अन् नौदलानं वाचवलं तोशाखान्यातील मौल्यवान हार विकून राष्ट्रीय तिजोरीचे नुकसान केल्याप्रकरणी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) कडून इम्रान यांच्याविरुद्ध तपास सुरू करण्यात आला आहे. अहवालात म्हटलं आहे की, हा हार लाहोरमधील एका ज्वेलरला परदेशातील पाकिस्तानी आणि मानव संसाधन विकासासाठी पंतप्रधानांचे माजी विशेष सहाय्यक झुल्फी बुखारी यांच्यामार्फत 18 कोटी रुपयांना विकला गेला होता. त्या रकमेपैकी फक्त एक अंश तोशाखानाला देण्यात आला होता. हे वाचा - पतीला युक्रेनी महिलांवर बलात्कार करायला सांगणारी कोण आहे रशियन महिला? या आरोपांना उत्तर देताना बुखारी म्हणाले की, हार विकल्याच्या वृत्तात तथ्य नाही. जिओ न्यूजशी बोलताना ते म्हणाले की, हाराविषयी कधीही चर्चा झाली नाही आणि आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत. दरम्यान, माजी माहिती मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, खान यांनी हे घड्याळ सरकारकडून खरेदी केलं होतं, जे दुसऱ्या देशाकडून भेट म्हणून मिळालं होतं. "मला समजत नाही की शाहबाज यांचा खरा मुद्दा काय आहे?" ते म्हणाले की, शाहबाज हे गोंधळात पडले आहेत कारण त्यांना खान यांच्यावर आरोप कसे लावायचे, हे समजत नाही. फवाद म्हणाले की, घड्याळाची किंमत काहीही असो, 'जर ते माझं असेल तर मी ते घड्याळ विकू शकतो, त्यामुळे कोणालाही अडचण असू नये.' माजी मंत्री आणि खान यांच्या निकटवर्तीयांनी शाहबाज यांना वरवरच्या गप्पांपासून दूर राहण्यास सांगितले आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Imran khan, Pakistan

    पुढील बातम्या