Home /News /videsh /

इम्रान यांना पंतप्रधान किंवा माजी पंतप्रधान सुद्धा म्हणू नये, 'मनोरुग्ण' म्हणावं; मरियम यांचे विषारी उद्गार

इम्रान यांना पंतप्रधान किंवा माजी पंतप्रधान सुद्धा म्हणू नये, 'मनोरुग्ण' म्हणावं; मरियम यांचे विषारी उद्गार

इम्रान यांना आता पंतप्रधान किंवा माजी पंतप्रधान म्हणून सुद्धा वागवलं जाऊ नये. त्यापेक्षा त्यांना आता एक 'मनोरुग्ण' समजलं पाहिजे. तो माणूस फक्त स्वतःची कातडी वाचवण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीला धरतो, असं मरियम यांनी म्हटलंय.

    इस्लामाबाद, 9 एप्रिल : पाकिस्तानात (Pakistan)  इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर विरोधकांकडून दररोज आगपाखड केली जात आहे. आता मरियम नवाझ शरीफ यांनी इम्रान यांना मनोरुग्ण (PSYCHOPATH ) म्हटलं आहे. तसंच, अशा माणसाच्या हातात संपूर्ण देश बरबाद करण्यासाठी दिला जाऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. इम्रान यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यापासून त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे. 'जो माणूस आता संवेदनाशून्य झाला आहे, त्याला संपूर्ण देशाला उद्ध्वस्त करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. हा काही विनोद नाही. त्यांना आता पंतप्रधान किंवा माजी पंतप्रधान म्हणून सुद्धा वागवलं जाऊ नये. त्यापेक्षा त्यांना आता एक 'मनोरुग्ण' समजलं पाहिजे. तो माणूस फक्त स्वतःची कातडी वाचवण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीला धरतो. शरम वाटली पाहिजे,' असं ट्विट मरियम यांनी केलं आहे. इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात आल्यापासून त्यांनी भारताच्या स्तुतीचे पूल बांधण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी 27 मार्चला पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका विशाल जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी स्वतंत्र परराष्ट्र धोरण स्वीकारल्याबद्दल भारताचं कौतुक केलं (Imran Khan praises India) होतं. त्यानंतर 8 एप्रिलला त्यांनी पाकिस्तानी जनतेला दिलेल्या संदेशात पुन्हा एकदा भारताच्या परराष्ट्र धोरणाचं खुलेपणानं कौतुक केलं. देशाला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, जगातील कोणत्याही देशामध्ये 'रशियाबाबत तुम्ही असं धोरण ठेवावं', हे भारताला सांगण्याची हिंमत नाही. भारत एक स्वाभिमानी देश आहे. कोणत्याही महासत्तेकडे भारताविरुद्ध काहीही करण्याची क्षमता नाही. आरएसएस आणि काश्मीरमुळे आमचे संबंध खराब आहेत. पण मलाही माझ्या देशाची आणि इथल्या लोकांचीही अशीच परिस्थिती हवी आहे. मरियम यांचा इम्रान यांना सल्ला, तुम्ही भारतात जाऊन रहा इम्रान खान यांच्या तोंडून भारताची स्तुती झालेलं विरोधी पक्षाच्या नेत्यांना आवडलेलं नाही. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझच्या नेत्या मरियम नवाज (Maryam Nawaz Sharif) यांनी भारताचं कौतुक करण्यावरून इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मरियम नवाझ शरीफ यांनी ट्विट करून म्हटलंय की, "खुर्ची हातून निघून जाताना पाहून वेड लागलेल्या या माणसाला कोणीतरी सांगा की, त्यांचाच पक्ष त्यांना सत्तेवरून हटवणार आहे. इतर कोणी हे करत नाहीये. जर तुम्हाला भारत इतकाच आवडत असेल तर पाकिस्तान सोडून तिकडेच जाऊन रहा. हे वाचा - पैसा-दागिने ठीक आहे, पण या चोरट्यांचं भलतंच काम; 17 लाखांच्या या पदार्थावर डल्ला ..भारताची स्तुती आवडली नाही, पण त्यांनीही दिलं भारताचंच उदाहरण मरियम नवाझ शरीफ पुढे म्हणाल्या, 'भारताची स्तुती करणाऱ्या व्यक्तीने हे जाणून घेतलं पाहिजे की, तेथील विविध पंतप्रधानांविरोधात विरोधकांनी 27 वेळा अविश्वास प्रस्ताव आणला आहे. मात्र संविधान, लोकशाही आणि त्याची तत्त्वं यांच्याशी कोणीही तडजोड केलेली नाही. अटलबिहारी वाजपेयींना एका मताने आपली सत्ता गमावली होती. पण त्यांनी तुमच्यासारखी देश आणि राज्यघटना गहाण ठेवली नाही. इम्रान यांची खुर्ची वाचवण्यासाठी त्यांची पत्नी कोंबड्यांचा बळी देत असल्याचाही विरोधकांकडून आरोप पंतप्रधान पदाचे सध्याचे दावेदार शाहबाज शरीफ यांनी काही दिवसांपूर्वी इम्रान यांची खुर्ची वाचवण्यासाठी त्यांची पत्नी कोंबड्यांचा बळी देत असल्याचा आरोप केला होता. इम्रान यांची पत्नी बुशरा बीबीला दोन जिन्न (मानवाच्या मृत्यूनंतर भटकणारे आत्मे) वश असून इम्रान यांच्या घरात काळ्या जादूचे प्रयोग सुरू असल्याचं विरोधकांनी म्हटलं होतं. यासाठी त्यांच्या घरी रोज हजारो टन मांस जाळलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. इम्रान त्यांची खुर्ची वाचवण्याचे वाटेल तसे प्रयत्न करत असल्याचं पाकिस्तानातील मीडियामध्येम्हटलं जात आहे. यामुळे त्यांच्याविषयी नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. हे वाचा - व्लादिमीर पुतिनच्या दोन मुली सध्या राहतात कुठे? दोघींच्या Secret Life बद्दल जाणून घ्या सर्व काही पाकिस्तानच्या संसदेत आज अविश्वास प्रस्तावावर मतदान पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव मतदानाशिवाय फेटाळला आणि राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी इम्रान खान यांच्या संसद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली या दोन्ही बाबी पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवल्या. सुप्रीम कोर्टाने पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली बहाल करण्याचा आणि इम्रान खान सरकारविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यासाठी ९ एप्रिल रोजी विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय दिला होता.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Imran khan, Pakistan

    पुढील बातम्या