इम्रान खान यांना जोरदार झटका! पाकिस्तानी अर्थव्यवस्था कोलमडली, आत्तापर्यंतची सर्वाधिक तोटा

इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाले त्याला बरोबर एक वर्षं झालं आणि आजच्याच दिवशी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेबद्दल एक मोठी बातमी बाहेर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 03:24 PM IST

इम्रान खान यांना जोरदार झटका! पाकिस्तानी अर्थव्यवस्था कोलमडली, आत्तापर्यंतची सर्वाधिक तोटा

इस्लामाबाद, 28 ऑगस्ट : इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाले त्याला बरोबर एक वर्षं झालं आणि आजच्याच दिवशी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेबद्दल Pakistan Economy एक मोठी बातमी बाहेर आली आहे. हा देश दिवाळखोरीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र Dawn डॉनमध्ये आलेल्या एका बातमीनुसार, गेल्या वर्षभरात त्यांच्या देशाला प्रचंड मोठी वित्तीय तूट सोसावी लागली. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या GDP च्या 8.9 टक्के एवढं फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट या देशाला भोगावी लागली आहे.

डॉनच्या बातमीनुसार, पाकिस्तानच्या निर्मितीनंतर आतापर्यंतच्या इतिहासात ही वित्तीय तूट सर्वाधिक आहे. साध्या भाषेत सांगायचं तर सरकारी उत्पन्न प्रचंड घटलं आहे आणि त्यामानाने खर्च मात्र खूप वाढले आहेत. त्यामुळे पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला आहे.

हेही वाचा - इम्रान खान अणुयुद्धाची धमकी देत होते तेव्हा PM मोदी होते पाकच्या हवाई हद्दीत!

काही दिवसांत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ही स्वायतत्त संस्थाही पाकिस्तानला दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठी किती निधी Pakistan Bailout Package चा अभ्यास करायला जाणार आहे. या सगळ्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था योग्य दिशेने नेण्यासाठी IMF ने काही अटी घातल्या होत्या. पण पाकिस्तानातल्या इम्रान खान सरकारने यातली कुठलीही अट अद्याप पूर्ण केलेली नाही.

Loading...

हेही वाचा - पाक बिथरला : इम्रान खान यांनी दिली अणुयुद्धाची धमकी, महासत्तेलाही दिला हा इशारा

या वृत्तानुसार, इम्रान खान सरकराने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी 20 टक्के खर्च जास्त केला. पण सरकारी तिजोरीत मात्र फार भर पडलेली नाही. उलट 6 टक्के कमी रक्कम सरकारी तिजोरीत जमा झाली आहे. पाकिस्तानच्या अर्थमंत्रालयाच्या आकड्यांनुसार, या देशाने कर्ज चुकवण्यासाठीचा आणि संरक्षण खर्चासाठीच 3.23 ट्रिलियन खर्च केले. सरकारी खर्चाच्या 80 टक्के एवढी ही रक्कम आहे. संरक्षण खर्च एवढा भरमसाठ वाढलेला असतानाही पाकिस्तान युद्धखोरीची भाषा करत आहे. भारताचा अंतर्गत प्रश्न असलेल्या काश्मीरमध्ये नाक खुपसणं या देशाने थांबवलेलं नाही. काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडण्याचा विचार इम्रान खान यांनी नुकताच बोलून दाखवला. या वेळी अणुयुद्धाची धमकीही त्यांनी दिली.

VIDEO: ...आणि त्याने राहुल गांधींच्या गालावर KISS केलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 03:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...