मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

इम्रान खाननी TWEET केला भारतीय पोलिसांच्या अत्याचाराचा Fake VIDEO; UP पोलिसांनी केला पर्दाफाश

इम्रान खाननी TWEET केला भारतीय पोलिसांच्या अत्याचाराचा Fake VIDEO; UP पोलिसांनी केला पर्दाफाश

देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेता लॉकडाऊन करणं शक्य नाही, असा निर्णय पाकच्या पंतप्रधानांनी घेतला.

देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेता लॉकडाऊन करणं शक्य नाही, असा निर्णय पाकच्या पंतप्रधानांनी घेतला.

भारतातल्या अनेक फॅक्टचेक करणाऱ्या माध्यमांनी त्या व्हिडीओचं मुळ शोधून काढत इम्रान खान यांचा खोटारडेपणा उघड केलाय.

  • Published by:  Ajay Kautikwar

नवी दिल्ली 03 जानेवारी : CAAच्या विरोधात सर्व देशभर विरोध प्रदर्शन होत आहेत. जगभर त्याची दखलंही घेतली गेलीय. या प्रकरणी पाकिस्तान खोटा प्रचार करत असल्याचं उघड झालंय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक फेक व्हिडीओ ट्वीट करत उत्तर प्रदेश पोलीस मुस्लिमांवर अत्याचार करत असल्याचा दावा केला होता. यावरून पाकिस्तान भारतातल्या आंदोलनाचा गैरफायदा घेत खोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचं उघड झालंय. खान यांनी बनावट व्हिडीओ ट्वीट केल्याचं सोशल मीडियावरून उघड झाल्याने ते ट्वीट डिलीट करण्याची नामुष्की पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर आली. CAA वरून उत्तर प्रदेशचे पोलीस मुस्लिमांवर अत्याचार करत असल्याचं या व्हिडीओत दिसत असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. मात्र त्यावरून सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडीओ खोटा असल्याचं म्हटलंय.

भारतातल्या अनेक फॅक्टचेक करणाऱ्या माध्यमांनी त्या व्हिडीओचं मुळ शोधून काढलंय. हा व्हिडीओ ढाक्यातला असून तो मे 2013 मधला असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी पुराव्यासह दाखवून दिलंय. त्यासाठी त्यांनी पुरावेही दिले आहेत. त्यामुळे इम्रान खान यांचा ढोंगीपणा उघड झालाय. एका राष्ट्रप्रमुखाने एवढं बेजबाबदार काम करावं का असा प्रश्न आता विचारला जात आहे.

मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाकिस्तान अपप्रचार करत असल्याचा आरोप केला होता. या अपप्रचाराला काँग्रेससहीत विरोधीपक्ष साथ देत असल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. कर्नाटकातल्या तुमकूर इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार कोरडे ओढले. पंतप्रधान म्हणाले, संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाच्या विरुद्ध काँग्रेस देशभर मोर्चे काढत आहे. CAA, कलम 370 आणि अशा अनेक मुद्यांवरून त्यांनी काँग्रेसला धारेवर धरलं. पंतप्रधान म्हणाले, आम्हाला वारशात अनेक समस्या मिळाल्या आहेत. त्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मात्र काँग्रेस केवळ विरोधासाठी विरोध करत आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले, पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदुंचा धार्मिक आधारावरून छळ होतोय. त्यामुळे आपली जीव वाचविण्यासाठी सगळे हिंदू भारतात शरण घेण्यासाठी आले आहेत. त्यांना मदत करण्याचं सोडून त्यांच्याविरूद्ध मोर्चे काढले जात आहेत. या लोकांवर पाकिस्तानने अत्याचार केले मात्र त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढणाऱ्यांची तोंड या अत्याचाराविरुद्ध बंद आहेत. खरं तर त्यांनी पाकिस्तानचे कारनामे जगासमोर उघड करायला पाहिजे होते. मात्र तसे न करता ते व्होट बँकेचं राजकारण करत आहेत.

First published:

Tags: Imran khan