मोदींपुढे इमरान खान झुकले; पाकच्या पंतप्रधानावर माजी पत्नींच्या आरोपाने खळबळ!

रेहम यांनी केलेल्या या आरोपामुळे पाकिस्तानच्या विशेषत: इमरान खान यांच्या अचडणी वाढण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 08:12 PM IST

मोदींपुढे इमरान खान झुकले; पाकच्या पंतप्रधानावर माजी पत्नींच्या आरोपाने खळबळ!

इस्लामाबाद, 20 ऑगस्ट: मोदी सरकारने जम्मू-काश्मीर(Jammu Kashmir)ला विशेष अधिकार देणारे कलम 370 (Article 370)हटवल्यानंतर राज्याचे विभाजन केले आणि दोन केंद्र शासित प्रदेशांची निर्मिती केली. भारताच्या या निर्णयाने पाकिस्तान(Pakistan) अस्वस्थ झाला आहे. कलम 370चा मुद्दा आंतरराष्ट्रीय करण्याचा पाकचा प्रयत्न फसला. काश्मीर मुद्दा हा भारत आणि पाकिस्तानचा मुद्दा असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने मान्य केल्याने पाकिस्तान पु्न्हा एकदा तोंडावर पडले. आता इतक सर्व झाल्यानंतर पाकिस्तानला घरचा आहेर मिळाला आहे. पाकचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांची माजी पत्नी रेहम खान (Reham Khan)यांनी जम्मू-काश्मीर संदर्भात खळबळजनक खुलासा केला आहे. रेहम यांनी केलेल्या या आरोपामुळे पाकिस्तानच्या विशेषत: इमरान खान यांच्या अचडणी वाढण्याची शक्यता आहे.

रेहम खान यांनी पाकचे पंतप्रधान आणि माजी पतीवर असा आरोप केला आहे की, त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक गोपनीय करार केला आहे. रेहम यांच्या दाव्यानुसार या करारात भारताच्या पंतप्रधानांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे आणि केवळ यामुळेच इमरान भारताविरुद्ध कोणतेही ठोस पाऊल उचलत नाहीत. आम्हाला सुरुवातीपासून असे सांगण्यात आले आहे की काश्मीर पाकिस्तानचे होईल. पण मी म्हणते की काश्मीर विकले गेले आहे, असा खळबळजनक दावा रेहम यांनी केल्याचे वृत्त खलील टाईम्सने दिले आहे.

रेहम म्हणाल्या, भारताने 5 ऑगस्ट रोजी काश्मीर संदर्भातील निर्णय घेतल्यानंतर माझ्या टीम मेंबरमधील एकाचा मला फोन आला. ते म्हणाला, मॅडम तुम्ही जसे सांगितले होते तसच होतय. त्यावर मी प्रार्थना करू की अस काही घडू नये, अशी प्रतिक्रिया दिल्याचे रेहम यांनी सांगितले. रेहम यांनी असा दावा केला आहे की, मी गेल्या ऑगस्टमध्येच मोदी असा काही तरी निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदींना जे करायचे होते ते त्यांनी केले. त्यांना कलम 370 हटवायचे होते, त्यांनी ते केले कारण भारतातील जनतेने त्यांनी प्रचंड बहुमताने निवडूण दिले आहे.

इमरानला माहिती होते

Loading...

काश्मीर संदर्भात मोदी असा काही निर्णय घेणार आहेत याची इमरान खान यांना कल्पना होती असा दावा देखील रेहम यांनी केला आहे. इमरान यांनी सांगितले होते की, जेव्हा माझी आणि मोदींची भेट झाली होती तेव्हा ते माझ्याशी बोलताना गंभीर व कठोर होते. पुलवामा हल्ला झाल्यापासून मला याची कल्पना होती.

इमरान यांच्यावर आरोप करण्याची रेहम यांची ही पहिली वेळ नाही. याआधी अनेक वेळा त्यांनी इमरानवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीच्या दरम्यान रेहम यांनी एका पुस्तकात इमरान यांच्यावर समलैंगिक असल्याचा आरोप केला होता.

SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकरांच्या मनात काय, MIM ला दाखवणार का कात्रजचा घाट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 07:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...