Home /News /videsh /

इम्रान खान यांची पत्नी बुशरा करतेय 'काळी जादू'; जेमिमा यांनी शेअर केलेलं पोस्टर झालं VIRAL

इम्रान खान यांची पत्नी बुशरा करतेय 'काळी जादू'; जेमिमा यांनी शेअर केलेलं पोस्टर झालं VIRAL

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी जेमिमा (खान) गोल्डस्मिथ यांनीच एक पोस्टर शेअर केलं आणि 'तूने कैसा काला जादू किया' अशी कॅप्शन दिल्याने बुशरा बिबी खरंच काळी जादू करतात का वगैरे चर्चांना सोशल मीडियावर ऊत आला.

पुढे वाचा ...
    लाहोर, 19 फेब्रुवारी : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी जेमिमा (खान) गोल्डस्मिथ यांनी Twitter वर एक पोस्टर शेअर केलं आणि  'तूने कैसा काला जादू किया' अशी कॅप्शन दिल्याने इम्रान यांची सध्याची पत्नी बुशरा बिबी खरंच काळी जादू करतात का वगैरे चर्चांना सोशल मीडियावर ऊत आला.  वास्तविक जेमिमा जेमिमा गोल्डस्मिथ यांचं Tweet क्षणात व्हायरल झालं. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये इम्रान खान दिसत आहेत. एका बाजूला जेमिमाही दिसत आहे आणि शिवाय एक बुरखाधारी महिला दिसते आहे. यावरूनच जेमिमा यांनी एक विनोदी, उपरोधात्मक ट्वीट केलं. "लॉलीवूडचं (पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री)पोस्टर कुणाला आवडत नाही... आज मित्राने लाहोरमध्ये हे पोस्टर पाहिलं. कॅप्शन आहे - अशी कुठली काळी जादू केलीस तू" या अर्थाचं ट्वीट त्यांन पोस्टर शेअर करून लिहिलं. त्यांनी ही ट्वीट पोस्ट नंतर डीलिट केली. पण त्याअगोदरच हे ट्वीट व्हायरल झालं होतं. या पोस्टरमध्ये दिसणारी बुरखाधारी महिला म्हणजे इम्रान यांची तृतीय पत्नी बुशरा बीबी असल्याचं सांगितलं जातं. बुशरा बीबी काळी जादू करतात, अशी चर्चा पाकिस्तानात पूर्वीपासूनच चर्चा होती. त्या मंत्र-तंत्र, जादूटोणा यात तरबेज असल्याचं काही लोक सांगतात. यात किती तथ्य आहे आणि किती अफवा याबाबत माहिती नाही. पण आता जेमिमा यांनी शेअर केलेल्या पोस्टरच्या निमित्ताने पुन्हा नव्याने बुशरा बिबी यांची चर्चा सुरू झाली आहे. शाब्बास ! भयंकर 'कोरोना'वर भारताने केली मात, पहिल्या रुग्णालाही लवकरच डिस्चार्ज इम्रान खान यांची दुसरी पत्नी रेहम खान यांनीसुद्धा बुशरा बीबी यांच्यावर यापूर्वी निशाणा साधला होता. त्यांनीही बुशरा यांच्या काळ्या जादूचा उल्लेख एका पुस्तकात केला होता. आता जेमिमा यांनी उपरोधिक कॅप्शनद्वारे पुन्हा याची री ओढली आहे. पिंकी जादूगरनी पाकिस्तानात बुशरा बीबी यांना पिंकी जादूगरनी नावानं ओळखलं जातं. त्यांनी जादूटोणा केल्याच्या अफवा नेहमीच तिथल्या सोशल मीडियावर पिकत असतात. बुशरा यांची प्रतिमा आरशात दिसतच नाही यापासून अनेक अफवा त्यांच्यासंदर्भात पसरवल्या गेल्या आहेत. खुद्द इम्रान खान यांनी दिलेल्या एका मुलाखतीत पत्नी बुशरा यांच्या अध्यात्मिक ओढीविषयी आणि ताकदीविषयीचा उल्लेख केला होता. तेव्हापासून या चर्चांना उधाण आलं. अन्य बातम्या ऑफिस, 100 जणांच किचन, सर्जरी रुम; ट्रम्प यांचं विमान Air Force One असं आहे इम्रान खान यांचं पहिलं लग्न जेमिमा गोल्डस्मिथ यांच्याशी झालं. 2004 मध्ये जेमिमाला तलाक देऊन रेहम खानशी इम्रानने लग्न केलं. हे लग्न फक्त 10 महिने टिकलं. त्यानंतर इम्रान यांनी बुशरा बीबी यांच्याशी लग्न केलं. लग्नाआधीच कृती सेनन आहे प्रेग्नन्ट? सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Imran khan, Pakistan

    पुढील बातम्या