Home /News /videsh /

इम्रान खान यांना संघाचा फोबिया, सलग दोन दिवस टीका, काश्मीरबाबत नवी पोपटपंची

इम्रान खान यांना संघाचा फोबिया, सलग दोन दिवस टीका, काश्मीरबाबत नवी पोपटपंची

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मनातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) फोबिया दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं त्यांच्या विधानांमधून स्पष्ट होत आहे.

    नवी दिल्ली, 18 जुलै: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी काश्मीर प्रश्नावरून (Kashmir issue) पुन्हा एकदा वातावरण पेटवायला सुरुवात केल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. त्याचप्रमाणं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) त्यांच्या मनात असणारा फोबिया दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं त्यांच्या विधानांमधून स्पष्ट होत आहे. पाकव्याप्त काश्मीर (POK) भागातील निवडणूक प्रचारादरम्यान आपणच काश्मीर प्रश्नावरचे आंतरराष्ट्रीय ब्रँड ऍम्बेसेडर (International Brand Ambassador) असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका भारतानं एका सभ्य शेजाऱ्याप्रमाणं वर्तन करावं, अशी अपेक्षा आम्ही कित्येक दिवसांपासून करत आहोत. मात्र काय करणार, संघाचं तत्त्वज्ञान त्याच्या आड येतं, असं पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी म्हटलं होतं. उझबेकिस्तानमध्ये सुरु असलेल्या सेंट्रल साऊथ एशिया काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी हे विधान केलं होतं. तर शनिवारी आणखी एक खळबळजनक विधान करून त्यांनी संघाबाबतचा आपला फोबिया दाखवून दिल्याची चर्चा आहे. संघाचे विचार भारतासाठी धोकादायक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारधारा भारतासाठी धोकादायक असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. शनिवारी पाकव्याप्त काश्मीर परिसरात प्रचार करत असताना संघाचा किती धसका इम्रान खान यांनी घेतला आहे, याची प्रचिती आली. भाजप आणि संघाची विचारधारा ही केवळ मुस्लिमांनाच नव्हे, तर शीख आणि ईसाई नागरिकांनादेखील हिन दर्जाची वागणूक देत असल्याचं ते म्हणाले. इतर धर्मियांना संघाचे लोक बरोबरीची वागणूक देत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. हे वाचा - या देशाने कधीच पाहिला नाही असा विनाशकारी महापूर, पहा PHOTOS कलम 370 वरून टीकास्त्र जम्मू-काश्मीरमधून भारत सरकारनं कलम 370 हटवल्यानंतर राज्यातील परिस्थिती चिघळली असून काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाल्याची टीका इम्रान खान यांनी केली आहे. 5 ऑगस्ट 2019 पासून काश्मीरची स्थिती बिघडली असून या प्रश्नाचे आपणच आंतरराष्ट्रीय ब्रँड ऍम्बेसेडर आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. भारतानं कलम 370 पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केल्याशिवाय आपण भारताशी चर्चा करणार नाही, असं वक्तव्य त्यांनी जून महिन्यात केलं होतं.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Jammu kashmir, Pak pm Imran Khan, Pakisatan, Rss mohan bhagwat

    पुढील बातम्या