इम्रान खान लष्कराच्या हातचं बाहुलं; पूर्वाश्रमीच्या पत्नीचा आरोप

इम्रान खान लष्कराच्या हातचं बाहुलं; पूर्वाश्रमीच्या पत्नीचा आरोप

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांच्यावर पत्नीनं हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

कराची, 21 फेब्रुवारी : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनंच घरचा आहेर दिला आहे. 'इम्रान खान हे पाक लष्कराच्या हातातील बाहुलं' असल्याची टिका रेहाम खाननं केली आहे. रेहाम इम्रान खान यांची तिसरी पत्नी आहे. 'इंडिया टुडे'शी बोलताना रेहामनं इम्रान खान यांच्यावर जबरदस्त हल्ला चढवला आहे. इम्रान खान आणि रेहाम खान यांच्यामध्ये घटस्फोट झाला आहे. यापूर्वी देखील रेहामनं आपल्या आत्मचरित्रामध्ये देखील इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

महत्त्वाची बाब म्हणजे पुलवामा येथे आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी इम्रान लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाट पाहत होते. अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्यावर प्रतिक्रिया दिल्याचं रेहाम खाननं म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाली रेहाम?

आपल्या विचारधारेशी तडजोड करूनच इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. सध्याची विचारधारा ही त्यांची नाही. लष्कराला जसं हवं आहे त्याचप्रकारे इम्नान खान वागत आहेत. याबद्दल कोणतीही शंका नाही. निवडणुकीच्या वेळी आम्ही इस्लामाबाद येथे झालेली दंगल अद्याप विसरू शकलो नाही. यावेळी आम्ही एका कट्टरतावाद्याचा उदय होताना पाहीला. खूप मोठ्या दंगली झाल्याचा अनुभव देखील आम्ही घेतला आहे. इम्रान खाननं भारताला जशास तसं उत्तर देण्याची भाषा केली. त्यानंतर रेहामनं इम्रान खान यांना लक्ष्य केलं आहे.

लष्कराकडून सांगितलं जात आहे त्याच गोष्टी केवळ इम्रान खान करत आहेत. पुलवामा हल्ल्यापूर्वी आम्ही Financial Action Task Force [FATF]च्या काळ्या यादीत आहोत. असं देखील रेहामनं म्हटलं आहे.

तर भारताला हवं म्हणून नाही तर देशातील अंतर्गत शांततेसाठी आता सरकारनं दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी असं देखील रेहाम म्हणाली आहे.

काय म्हणाले होते इम्रान खान

पुलवामा हल्ल्यानंतर इम्नान खान यांनी भारतानं आम्हाला लक्ष्य केल्यास आम्ही सहन करणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल. युद्ध तर सुरू होईल पण, ते केव्हा थांबेल याबद्दल मात्र देवच जाणो! अशा शब्दात इम्रान खान यांनी भारताला उत्तर दिलं होतं.

VIDEO: महिलेने मारली ट्रॅकवर उडी, अख्खी ट्रेन अंगावरून गेली पण...!

First Published: Feb 21, 2019 08:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading