S M L

हे घृणास्पद! महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा मोदींना सल्ला

कठुआतील घटना बीभत्स असून पंतप्रधान मोदींनी या घटनेची गंभीर दखल घेऊन महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 20, 2018 12:07 PM IST

हे घृणास्पद! महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा मोदींना सल्ला

20 एप्रिल : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तिना लगार्ड यांनी भारतातील महिलांच्या लैंगिक शोषणावर चिंता व्यक्त केली आहे. कठुआतील घटना बीभत्स असून पंतप्रधान मोदींनी या घटनेची गंभीर दखल घेऊन महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

क्रिस्तिना लगार्ड म्हणाल्या की, "भारतामध्ये जे काही घडले ते घृणास्पद आहे. मला आशा आहे की नरेंद्र मोदी सरकार याकडे अधिक लक्ष देईल कारण हे भारतातील स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचे आहे."

दावोसमध्ये असताना क्रिस्तिना यांनी भारतीय महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला होता. दावोसच्या भाषणात मोदींनी भारतीय महिलांचा फारसा उल्लेख केला नव्हता. आणि हे क्रिस्तिना यांनी मोदींच्या निदर्शनासही आणून दिलं होतं.दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बलात्कारांच्या घटनांमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरलेली असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनांची दखल घेतली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 12:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close