क्यूएस ब्रिक्स विद्यापीठांच्या क्रमवारीत आयआयटी मुंबई 9व्या स्थानी

क्यूएस ब्रिक्स विद्यापीठांच्या क्रमवारीत आयआयटी  मुंबई 9व्या स्थानी

क्युएस एजन्सीची ही क्रमवारी 10 निकषांवर बनवण्यात आली. यात विद्यार्थ्यांचे कार्य, शैक्षणिक गुणवत्ता इत्यादी गोष्टींचा विचार करण्यात आला होता.

  • Share this:

23 नोव्हेंबर:   संशोधन आणि नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयआयटी मुंबईची गगनभरारी सुरूच आहे. क्यूएस एजन्सीने जाहीर केलेल्या क्रमवारीत ब्रिक्स देशातील विद्यापीठांमध्ये आयआयटी मुंबईचा पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये नंबर लागला आहे.

क्युएस एजन्सीची ही क्रमवारी 10 निकषांवर बनवण्यात आली. यात विद्यार्थ्यांचे कार्य, शैक्षणिक गुणवत्ता इत्यादी गोष्टींचा विचार करण्यात आला होता. या यादीतील पहिली तिन्ही विद्यापीठंही चीनचीच आहेत. याशिवाय आयआयएससी बॅंगलोर ,आयआयटी दिल्ली,आयआयटी कानपूरचा पहिल्या 20मध्ये नंबर लागलाय. तर आयआयटी रूरकी 51व्या क्रमांकावर आहे. या क्रमांकांनुसार आयआयटी मुंबईचा देशात पहिला क्रमांक लागला आहे. काही दिवसांपूर्वी आपलं आंतरराष्ट्रीय रॅंकिंगही आयआयटी मुंबईने सुधारून पहिल्या 200 विद्यापीठांमध्ये  हजेरी लावली होती.

याशिवाय  आशियाई क्रमवारीत आयआयटी मुंबई ३४व्या स्थानावर पोहोचली असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2017 01:19 PM IST

ताज्या बातम्या