Home /News /videsh /

'मोहम्मद पैगंबर जिवंत असते तर...'; लेखिका तसलीमा नसरीन यांच्या वक्तव्यामुळे वादंग

'मोहम्मद पैगंबर जिवंत असते तर...'; लेखिका तसलीमा नसरीन यांच्या वक्तव्यामुळे वादंग

लेखिका आपल्या या ट्विटनंतर वादात अडकली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर तसलीमा नसरीन यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

    नवी दिल्ली, 11 जून: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे देशभरात आंदोलनं सुरू आहेत. यादरम्यान बांग्लादेशी लेखिका तसलीमा नसरीन (Taslima Nasreen Tweet) यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. यात त्यांनी लिहिलं की, आज जर मोहम्मद पैंगबर जीवंत असते तर जगभरातील मुस्लीम कट्टरपंथींचं वेडेपण पाहून हैराण झाले असते. लेखिका आपल्या या ट्विटनंतर वादात अडकली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर तसलीमा नसरीन यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. शुक्रवारी अनेक राज्यात नुपूर शर्मा यांच्या टिप्पणीमुळे आंदोलन केलं जात होतं. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या होत्या. 'मसीहा नाही, पैगंबर नाही, देव नाही...' दुसर्‍या ट्विटमध्ये लेखिका तस्लिमा नसरीनने लिहिलं की, "कोणीही टीकेच्या वर नाही, माणूस नाही, संत नाही, मसीहा नाही, पैगंबर नाही, देव नाही. जगाला अधिक चांगलं बनवण्यासाठी टीका आवश्यक आहे. मुस्लीम लेखिका तसलीमा नसरीन स्वत:ला नास्तिक म्हणवून घेतात.  मोहम्मद पैगंबरांविरोधात भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या वक्तव्याविरोधात उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मुस्लीम समुदायाने विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. प्रयागराज, लखनऊ, मुरादाबाद आणि सहारनपूरमध्ये गोंधळ आणि घोषणाबाजी झाली. येथील अटाला येथे जुमेच्या नमाजानंतर घोषणाबाजी झाली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचवेळी दगडफेक सुरू झाली होती. पोलिसांनी लाठीहल्ला करून उपद्रव करणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं आहे. यानंतरही उपद्रवी शांत झाले नाही. त्यामुळे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. हवेत गोळीबारही करण्यात आला. दगडफेकीत आयजी राकेश सिंह हेही जखमी झाले आहेत. याशिवाय अनेक पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर बडे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या