Pulwama Attack: आमच्यावर हल्ला केल्यास प्रत्युत्तर देणार, इम्रान खान यांची भारताला धमकी

Pulwama Attack: आमच्यावर हल्ला केल्यास प्रत्युत्तर देणार, इम्रान खान यांची भारताला धमकी

कोणताही पुरावा न देता भारत पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या नावाने बोट मोडत आहे, अशा प्रकारची टीका करत पाकिस्तानचे पंतप्रधान इमारन खान यांनी भारताला काश्मीर प्रश्न चर्चेने सोडवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 19 फेब्रुवारी: कोणताही पुरावा न देता भारत पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या नावाने बोट मोडत आहे, अशा प्रकारची टीका करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला काश्मीर प्रश्न चर्चेने सोडवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर आरोप केले. पण त्यावर मी तातडीने उत्तर दिले नाही. कारण सौदीचे राजे पाक दौऱ्यावर होते. पाकिस्तानमधील गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाची परिषद होती आणि तेव्हा मी बोललो असतो तर सर्व लक्ष त्या परिषदेवरून दुसरीकडे गेले असते.

पुलवामा हल्ल्या झाल्यानंतर कोणताही पुरावा न देता भारताने पाकिस्तानवर आरोप केला. आमच्या देशात इतक्या महत्त्वाची बैठक सुरु असताना आम्ही अशा कृतीचा कसा काय विचार करु, असा उलट सवाल इम्रान यांनी भारताला विचारला. सौदीचे राजे पाकिस्तान भेटीवर नसते तरी पुलवामा सारखा हल्ला करुन आम्हाला काय फायदा होणार. पाकिस्तान गेल्या 15 वर्षापासून दहशतवादाचे चटके सहन करत आहे. तब्बल 70 हजार नागरिक त्यात मारले गेले आहेत, असे इम्रान यांनी सांगितले.

पुरावे द्या आम्ही कारवाई करु

पुलवामा हल्ल्यासंदर्भात भारताने पुरावे द्यावेत आम्ही त्यांच्यावर कारवाई करु. यासंदर्भात सर्व प्रकारच्या चौकशीमध्ये भारताला पूर्ण सहकार्य करण्याची पाकिस्तानची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. पुलवामा हल्ल्यात जर कोणी पाकिस्तानी नागरिक असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची मी हमी देतो, असे आश्वासन इम्रान खान यांनी दिले. तसेच आम्ही कोणाच्या दबावाखाली कारवाई करणार नाही तर जो पाकिस्तानचा शत्रू असेल त्याविरोधात ही कारवाई असेल.काश्मीर प्रश्ना संदर्भात चर्चा करण्याआधी भारताची अट असते की प्रथम दहशतवादावर चर्चा करू. आम्ही दहशतवादाच्या मुद्द्यावर देखील चर्चा करण्यास तयार आहोत, असे इम्रान यांनी स्पष्ट केले.

हा नवा पाकिस्तान आहे

पाकिस्तानच्या भूमीचा कोणी दहशतवादासाठी उपयोग करु नये आणी बाहेरून देखील कोणी पाकिस्तानमध्ये दहशतवाद निर्माण करु नये हेच आमचे धोरण असल्याचे इम्रान यांनी सांगितले. आम्हाला स्थिरता हवी आहे, असे असे सांगित त्यांनी काश्मीरचा प्रश्न बंदूकीने नाही तर चर्चेने सोडवावा असा प्रस्ताव भारताला दिला आहे.

भारताने आमच्यावर हल्ला करण्याचा विचार करु नये

काश्मीरमध्ये काहीही घडले तर त्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले जात असेल तर ते चुकीचे आहे. पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारतातील राजकीय नेते, नागरिक आणि मीडियामध्ये अशी चर्चा सुरु झाली आहे की पाकिस्तानवर हल्ला करा, पाकिस्तानला धडा शिकवा. पण जगातील कोणता असा कायदा आहे की जो भारताला अशा प्रकारे हल्ला करण्याचा अधिकार देतो. सध्या भारतात निवडणुकीचे वर्ष आहे. अशा काळात पाकिस्तानवर हल्ला करा अशा प्रकारच्या घोषणामुळे राजकीय फायदा होऊ शकतो. पण भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास आम्ही हल्ला करण्याचा विचार करणार नाही तर त्याला सडेतोड उत्तर देखील देऊ, असा इशारा इम्रान खान यांनी भारताला दिला.


VIDEO : आमच्यावर आक्रमण करण्याचा भारतानं विचारही करू नये - इम्रान खान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 01:48 PM IST

ताज्या बातम्या