कुलभुषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती द्या, भारताची मागणी

कुलभुषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती द्या, भारताची मागणी

  • Share this:

LIVE UPDATE :

15 मे : कुलभूषण जाधव यांच्या फाशीप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. भारताची विनंती न्यायाधीशांनी वाचून दाखवली.

भारताकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे बाजू मांडत आहेत. कुलभुषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्याचं भारताचं अपील

तर पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असंही भारतानं स्पष्ट केलंय.

जाधव यांना भेटण्याची भारताने केलेल्या 16 विनंत्या पाकिस्तानने फेटाळल्या चा दावाही भारतानं केलाय.

पाकिस्ताननं सर्व कायदे मोडत कुलभुषण जाधव यांना भारताला भेटू दिलं नाही,जा धव यांच्या प्रृकती बाबतही भारताला माहिती दिली गेली नाही, असंही भारतानं स्पष्ट केलंय.

याप्रकरणी भारताने आंतराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. भारतीय वेळेनुसार आज दुपारी दीड वाजता या सुनावणीला सुरुवात झालीये. भारतातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे भारताची बाजू मांडतायेत. रात्री साडेआठ वाजेपर्यंत ही सुनावणी सुरू राहील असा अंदाज आहे. तर भारत आणि पाकिस्तान आपापली बाजू मांडणार असून या न्यायालयात दोन्ही देश तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

 

First published: May 15, 2017, 10:26 AM IST

ताज्या बातम्या