IND vs AFG : जे इंग्लंडलाही नाही जमलं असा पराक्रम करण्यास टीम इंडिया सज्ज!

IND vs AFG : जे इंग्लंडलाही नाही जमलं असा पराक्रम करण्यास टीम इंडिया सज्ज!

अफगाणिस्तान विरोधात आपल्या नावावर एक अनोखा विक्रम करण्याची संधी भारतीय संघाकडे असणार आहे.

  • Share this:

साऊदम्पटन, 22 जून : ICC Cricket World Cup : ICC Cricket World Cup स्पर्धेचा महासंग्रामात आता चुरस वाढली आहे. सेमीफायनलला कोणते संघ पोहचतील याचाही अंदाज येऊ लागला आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहत गुणतक्त्यात पहिल्या चारमध्ये आपले स्थान कायम राखलं आहे. यातच आज भारतीय संघ अफगाणिस्तान विरोधात दोन हात करणार आहे. अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही, त्यामुळं त्यांचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळं आज भारतीय संघ वरचढ असणार आहे. अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवत भारतीय संघ गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहचू शकतो.

वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच उतरणाऱ्या अफगाणिस्ताननं आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात साऊदम्पटन मैदानावर सामना होत आहे, याच मैदानात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाला होता. त्यामुळं भारतीय चाहते चिंतेत आहेत.

भारतीय संघ करणार अनोखा विक्रम

अफगाणिस्तान विरोधात आपल्या नावावर एक अनोखा विक्रम करण्याची संधी भारतीय संघाकडे असणार आहे. आजचा सामना जिंकल्यास हा भारताचा वर्ल्ड कपमधला 50वा विजय असेल. वर्ल्ड कपमध्ये भारतानं आतापर्यंत 78 सामने खेळले आहेत, त्यातील 49 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांना 50हून अधिक सामन्यात विजय मिळवता आला आहे. ऑस्ट्रेलियानं 67 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, न्यूझीलंडनं 52 सामन्यात विजय मिळवला आहे.

भारत दुसऱ्या क्रमांकावर

वर्ल्ड कपमध्ये भारत सर्वात जास्त विजय मिळवणारा तिसरा संघ आहे. मात्र, विजयाच्या टक्क्य़ांचा विचार केल्यास भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या विजयाचा टक्का आतापर्यंत 62 % आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा टक्का 74 आहे.

हेड-टू-हेड

भारत-अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. यात एक सामना भारतानं जिंकला तर, एक सामना टाय झाला होता. या दोन्ही संघात 2014मध्ये आशियाई चषक स्पर्धेत पहिला सामना झाला होता.

वाचा- भारताच्या विजयात पावसाचा खोडा? काय आहे हवामानाचा अंदाज

वाचा- पंतने केला खुलासा, World Cup संघात नाव नाही हे समजल्यावर काय केलं

वाचा- विराटचा डोळा सचिन आणि लाराच्या विश्वविक्रमावर; अफगाणविरुद्ध आहे संधी!

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 12:17 PM IST

ताज्या बातम्या