• होम
  • व्हिडिओ
  • World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा
  • World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा

    News18 Lokmat | Published On: Jul 5, 2019 10:06 AM IST | Updated On: Jul 5, 2019 10:10 AM IST

    मुंबई, 05 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये बुधवारी झालेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या सामन्यात एक अजब घटना घडली. 34वी ओव्हर सुरू असताना एक व्यक्ती चक्क नग्न अवस्थेत मैदानात आल्याने एकच आश्चर्य निर्माण झालं. सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्नही केला. पण तो त्यांच्या हाती काही लागला नाही. न्यूझीलंड संघाच्या बॅटींगच्या वेळी तो मैदानात चक्क नग्नावस्थेत पळत सुटला आणि पिचवर विचित्र पद्धतीने उड्याही मारू लागला. हा सर्व प्रकार सुरू असतांना सामन्याला उपस्थित प्रेक्षकांमध्ये एकच हशा उसळाला. त्याला पकडण्यासाठी सुरक्षारक्षकांना मोठी कसरत करावी लागली यात काही शंका नाही. कारण हा व्यक्ती सुरक्षारक्षकांच्या हाती काहीही करता लागतच नव्हता. यावेळी टीमचे खेळाडूही हा सर्व प्रकार पाहत होते. शेवटी मोठ्या कसरतीनंतर त्याला पकडण्यात यश आलं. यानंतर सुरक्षारक्षकांनी त्या नग्न व्यक्तीला कपड्यांनी झाकलं आणि मैदानातून बाहेर काढलं. यामुळे मैदानात एकच हशा पिकला होता. दरम्यान या सर्व विचित्र प्रकारानंतर सामना पुन्हा सुरू झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading