IND vs AFG : आज भारत परिधान करणार भगव्या रंगाची जर्सी? PHOTO VIRAL

IND vs AFG : आज भारत परिधान करणार भगव्या रंगाची जर्सी? PHOTO VIRAL

भारतीय संघ यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत एका सामन्यात भगव्या रंगाच्या जर्सीत खेळणार आहे.

  • Share this:

साऊदम्पटन, 22 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेचा महासंग्रामात आता चुरस वाढली आहे. सेमीफायनलला कोणते संघ पोहचतील याचाही अंदाज येऊ लागला आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहत गुणतक्त्यात पहिल्या चारमध्ये आपले स्थान कायम राखलं आहे. चारपैकी तीन सामने भारताने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला. भारत आज अफगाणिस्तान विरोधात साऊदम्पटनच्या मैदानावर खेळणार आहे. तर. 27 जूनला वेस्ट इंडिज आणि 30 जूनला इंग्लंडविरुद्ध लढत होणार आहे. त्यानंतर बांगलादेश आणि लंकेविरुद्ध सामना होणार आहे.

दरम्यान भारत अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध खेळताना भगव्या रंगाची जर्सी घालण्याची शक्यता आहे. या तीनही संघांच्या जर्सीचा रंग मिळताजुळता असल्याने एका संघाला सामन्यावेळी वेगळी जर्सी घालावी लागणार आहे. भारत नक्की कोणत्या रंगाची जर्सी घालणार याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर भगव्या रंगातील जर्सीचे फोटो व्हायरल होत आहेत.

आयसीसीचे जर्सीबाबत काही नियम आहेत. या नियमानुसार एकाच रंगाची जर्सी घालून दोन संघांना सामन्यात उतरता येत नाही. त्यासाठी एका संघाच्या जर्सीचा रंग बदलला जातो. फुटबॉलच्या सामन्यात या नियमाचा वापर केला जातो. त्याच धर्तीवर क्रिकेटमध्ये हा नियम आयसीसीने अवलंबला आहे.

इंग्लंडविरुद्ध भारत आणि अफगाणिस्तानला जर्सीचा रंग बदलावा लागेल. यात इंग्लंडला त्यांच्याच जर्सीत खेळण्याची मुभा आहे. वर्ल्ड कपचे यजमानपद इंग्लंडकडे असून त्यांना आहे त्या जर्सीत खेळता येणार आहे.

आतापर्यंत भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत निळ्या रंगाच्या शेड्सच्या जर्सी परीधान केल्या आहेत. पण इंग्लंडचीही जर्सी निळ्या रंगाची असल्यामुळे भारताला त्यांच्यी जर्सीचा रंग बदलावा लागणार आहे, अशी चर्चा होती, परंतु या सामन्यात अफगाणिस्तान अवे जर्सी घालणार आहे.

अफगाणिस्तानच्या या जर्सीचे फोटो व्हायरल झाल्यामुळं भारतीय संघाच्या भगव्या रंगातील जर्सीचे फोटो हे फोटोशॉप केलेले असू शकतात. कारण बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

वाचा- भारताच्या विजयात पावसाचा खोडा? काय आहे हवामानाचा अंदाज

वाचा- पंतने केला खुलासा, World Cup संघात नाव नाही हे समजल्यावर काय केलं

वाचा- विराटचा डोळा सचिन आणि लाराच्या विश्वविक्रमावर; अफगाणविरुद्ध आहे संधी!

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading