इथून पुढे भारताची प्रत्येक मॅच स्टेडिअमध्येच जाऊन पाहणार - विजय माल्ल्या

इथून पुढे भारताची प्रत्येक मॅच स्टेडिअमध्येच जाऊन पाहणार - विजय माल्ल्या

  • Share this:

06 जून : बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून पळालेला विजय माल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत-पाकिस्तान यांच्यातील मॅचला उपस्थिती लावली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. या हायव्होल्टेज सामन्यात विजय माल्ल्या बिनधास्तपणे व्हीआयपी सेक्शनमध्ये बसून टीम इंडियाला चिअर करत होता. इतकंच नाहीतर भारताचे प्रसिद्ध माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांच्यासोबतही विजय माल्ल्या चर्चा करताना दिसला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

भारतातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियानं त्याबद्दल बातम्याही केल्या. सोशल मीडियातही दिवसभर त्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळं मल्ल्याचीही चीडचीड झाली असावी. त्यानं 2 ट्विट्सच्या माध्यमातून यासगळ्यावर आपली रिअॅक्शन दिली आहे.

'भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी मी एजबस्टनवर गेलो होतो. मीडियानं ते जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय. माझ्या उपस्थितीबद्दल सनसनाटी बातम्या दिल्या जाताहेत. हे सगळं पाहून मी ठरवलंय की, यापुढच्या सर्व सामन्यांना उपस्थित राहून भारताला प्रोत्साहन द्यायचं.' असं माल्ल्याने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आता माल्ल्याने आपण बिनधास्तपणे स्टेडिअममध्ये येऊन सामने पाहणार असल्याचं सांगत एकाप्रकारे भारतीय सरकाराला आव्हानच देऊन टाकलं आहे.

पुढच्या ट्विटमध्ये मल्ल्यानं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विराट हा जगातला सर्वोत्तम प्लेअर, सर्वोत्तम कॅप्टन आणि सर्वोत्तम व्यक्ती असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2017 02:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading