News18 Lokmat

मला हाफिज सईद आवडतो-परवेझ मुशर्रफ

हाफिज सईद पाकिस्तानच्या आणि काश्मिरच्या भल्यासाठी काम करतोय. तर लष्कर तैयबाही संघटना काश्मिरच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 29, 2017 04:39 PM IST

मला हाफिज सईद आवडतो-परवेझ मुशर्रफ

29 नोव्हेंबर: मला हाफिज सईद आवडतो असं वक्तव्य पाकिस्तानचे पूर्व राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी केलं आहे. तसंच त्यांनी  लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेला पाठिंबाही दिला आहे.

हाफिज सईद पाकिस्तानच्या  आणि काश्मिरच्या भल्यासाठी काम करतोय. तर लष्कर तैयबाही संघटना काश्मिरच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या दहशतवादी संघटना नाहीत. त्यांना भारत आणि अमेरिका  या देशांनी दहशतवादी करार दिला आहे. पण माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे असं त्यांचं म्हणणं आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या एका न्यायालयाने  हाफिज सईदची निर्दोष मुक्तता केली. यानंतर अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांनी पाकिस्तानवर सडेतोड टीका केली होती. आता यातच परवेझ मुशर्रफ यांनी हाफिज सईदला पाठिंबा दिला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 04:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...