• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • मी तालिबान्यांना दगडाने मारलं! पंजशीरच्या रणरागिणीची कहाणी, तालिबानी कॅम्पमध्येही निर्धार कायम

मी तालिबान्यांना दगडाने मारलं! पंजशीरच्या रणरागिणीची कहाणी, तालिबानी कॅम्पमध्येही निर्धार कायम

मी आणि इतर महिलांनीही तालिबान्यांना दगडाने मारलं, अशी प्रतिक्रिया (warrior woman says she hit taliban fighters with stones) पंजशीरमधील एका लढाऊ महिलेनं दिली आहे.

 • Share this:
  काबुल, 20 सप्टेंबर : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर त्यांच्याशी (Panjshir fight with Taliban) निकराचा लढा दिला पंजशीरनं. मी आणि इतर महिलांनीही तालिबान्यांना दगडाने मारलं, अशी प्रतिक्रिया (warrior woman says she hit taliban fighters with stones) पंजशीरमधील एका लढाऊ महिलेनं दिली आहे. पंजशीरमधून तालिबानच्या विरोधात केवळ सैनिकच नव्हे, तर प्रत्येक सर्वसामान्य माणूस (Every common man fought against Taliban) लढत असल्याचं तिने सांगितलं. आपण आपल्या बहिणी आणि  कुटुंबीयांसोबत तालिबानींना हाणून पाडत होतो, मात्र अखेर तालिबान्यांनी कब्जा केलाच, असा अनुभव तिने दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे. रणरागिणीची कहाणी लैलुमा नावाच्या या तरुणीनं नुकतीच ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला मुलाखत दिली. लैलुमा सध्या तालिबानच्या ताब्यातील छावणीमध्ये राहत असून आपण दिलेल्या लढ्याचा अभिमान असल्याचं तिनं म्हटलं आहे. जेव्हा तालिबाननं काबुलवर सत्ता प्रस्थापित केली, तेव्हा आपल्याला निकराचा लढा द्यायचा असल्याचं स्पष्ट झालं, असं लैलुमा सांगते. लैलुमासोबत तिचा पती, भाऊ, सासू, सासरे सगळेजण तालिबानविरोधात लढत होते. आमच्याकडे शस्त्रं नव्हती, मात्र आजूबाजूला पडलेले दगड घेऊन आम्ही तालिबान्यांवर हल्ले चढवत होतो, असं लैलुमानं या मुलाखतीत सांगितलं. लैलुमा सध्या कॅम्पमध्ये तालिबाननं पंजशीरवर ताबा मिळवल्यानंतर तिथल्या नागरिकांना सध्या काबुलमधील कॅम्पमध्ये ठेवलं आहे. मात्र तरीही आपण अखेरच्या क्षणापर्यंत लढत राहणार असून अहमद मसूद हेच आपले नेते असल्याचं तिनं म्हटलं आहे. आपण लवकरच आपल्या भागात, आपल्या घरी परत जाऊ, याचा तिला विश्वास आहे. मसूद सांगतील त्या मार्गावर आपण शेवटपर्यंत चालत राहणार असल्याचं तिनं म्हटलं आहे. हे वाचा - श्वानासाठी मालकानं बुक केला विमानातील पूर्ण बिझनेस क्लास; मोजले इतके पैसे महिलांवर तालिबानचे अत्याचार तालिबाननं सत्ता काबीज केल्यानंतर महिलांवर होणाऱ्या अन्यायाचं प्रमाण वाढत चाललं आहे. महिलांना सत्तेत वाटा न देणाऱ्या तालिबाननं घरातून बाहेर पडण्याची अप्रत्यक्ष बंदी घातली आहे. करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांनी देश सोडून जावं किंवा मरायला तयार राहावं, असा इशाराच तालिबाननं दिला आहे.
  Published by:desk news
  First published: