प्लेबॉयचे संस्थापक हयूज हेफनर यांचे निधन

हेफनर यांनी राहत्या घरीच अंतिम श्वास घेतला आहे. प्लेबॉय एन्टरप्रायजेसकडून पत्रक प्रसिद्ध करून हेफनर यांच्या मृत्यूबद्दलची माहिती देण्यात आली. १९५३ मध्ये ह्ययूज हेफनर यांनी प्लेबॉय मासिकाची सुरूवात केली होती.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2017 01:53 PM IST

प्लेबॉयचे संस्थापक हयूज हेफनर यांचे निधन

28 सप्टेंबर: प्लेबॉय या जगप्रसिद्ध मासिकाचे संस्थापक  ह्यूज  हेफनर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.

हेफनर यांनी राहत्या घरीच अंतिम श्वास घेतला आहे. प्लेबॉय एन्टरप्रायजेसकडून पत्रक प्रसिद्ध करून हेफनर यांच्या मृत्यूबद्दलची माहिती देण्यात आली. १९५३ मध्ये ह्ययूज हेफनर यांनी प्लेबॉय मासिकाची सुरूवात केली होती. नग्नता सेक्चुएलिटीशी संबंधित हे मासिक अमेरिकेत चांगलंच गाजलं. त्यांच्या आयुष्यातही हेफनर एक 'प्लेबॉय'च होते. 2012 साली वयाच्या 88व्या वर्षी त्यामनी त्यांच्याहून 60 वर्ष लहान मुलीशी लग्न केलं.हे त्यांचं आयुष्यातलं तिसरं लग्न होतं. अमेरिकनांची 'न्युडिटी'शी ओळख करून देणारा माणूस हेफनर प्रसिद्ध होते. अश्लील चित्र वितरीत केल्याबद्दल त्यांच्यावर 60च्या दशकात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 12:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...