कोरोना रुग्णांवर पुन्हा सुरू होणार हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचं ट्रायल - WHO

कोरोना रुग्णांवर पुन्हा सुरू होणार हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचं ट्रायल - WHO

आठवडाभरापूर्वी Hydroxychloroquine औषधाचं ट्रायल थांबवण्यात आलं होतं.

  • Share this:

जिनिव्हा, 03 जून : कोरोना रुग्णांवर अँटिमलेरिया औषध हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचे (Hydroxychloroquine) दुष्परिणाम लक्षात घेत जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) या औषधाचं ट्रायल थांबवलं होतं. मात्र आता पुन्हा या औषधाचं ट्रायल सुरू करणार आहे, अशी माहिती WHO ने दिली आहे.

कोरोनाव्हायरसविरोधात सध्या कोणतं औषध नाही. सध्या विविध आजारांवर उपलब्ध असलेल्या औषधांचं ट्रायल कोरोनावर उपचारासाठी केलं जातं आहे. त्यापैकी एक औषध आहे ते म्हणजे हायड्रोक्सिक्लोरोक्वीन. मात्र या औषधाचे कोरोना रुग्णांवर होणारे दुष्परिणाम पाहता जागतिक आरोग्य संघटनेनं याचं ट्रायल थांबवलं होतं.

डब्ल्यूएचओने या औषधाचं ट्रायल रोखलं तरी भारतानं रोखलं नव्हतं. भारतात या औषधाचे गंभीर परिणाम दिसून आले नाही, त्यामुळे भारतामध्ये कोरोना रुग्णांवर या औषधाचा वापर सुरूच आहे, असं आयसीएमआरने स्पष्ट केलं होतं. इतकंच नव्हे तर भारतात आणि जागतिक स्तरावर दिल्या जाणाऱ्या या औषधाच्या डोसमध्येही तफावत असल्याचं असल्याचे आयसीएमआरने जागतिक आरोग्य संघनटेच्या निदर्शनास आणून दिलं होतं. त्याबाबत WHO ला पत्र दिलं होतं.

हे वाचा - Good News पुण्यात 30 माकडांवर होणार कोरोना लसीचा प्रयोग

First published: June 3, 2020, 10:30 PM IST

ताज्या बातम्या