नवी दिल्ली 7 फेब्रुवारी : धावपळीच्या जीवनात गॅजेट्स एक महत्त्वपूर्ण भाग बनत आहेत आणि बर्याच समस्या सोडवत आहेत. मात्र, आपल्याला माहिती आहे का, की गॅजेट्स आता लोकांचे जीवन वाचविण्यासदेखील मदत करत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये अॅपल वॉचने (Apple Watch) एका 58 वर्षांच्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत.
पत्नीनं दिलं होतं गिफ्ट -
58 वर्षाच्या बॉबला त्यांच्या पत्नीनं लग्नाच्या 17 व्या वाढदिवसाला एक अॅपल वॉच गिफ्ट(Gift) दिलं होतं. या घड्याळामुळे बॉब यांना असणाऱ्या हृद्याच्या आजाराबद्दल माहिती झालं आणि त्यांची जीव वाचला.
असा झाला आजाराचा खुलासा -
पत्नीनं हे घड्याळ गिफ्ट दिल्यानंतर बॉब यांनी ते वापरण्यास सुरुवात केली. यात हार्ट रेट अॅपमध्ये रिडींग वाढल्याचं दिसून आलं. त्यांच्या हृद्याचे ठोके 120 प्रति मिनीट इतके होते. तर, रेस्टिंग रेट 60 बीपीएमपेक्षाही कमी होतं. हार्ट रेट वाढल्याचं दिसताच बॉब आणि त्यांची पत्नी लगेचच डॉक्टरांकडे गेले.
बॉब यांना आहे हा आजार -
डॉक्टरांनी सांगितलं, की बॉबला arrhythmia नावाचा आजार झाला आहे. यामुळे, त्यांच्या हार्टबीट सतत कमी, जास्त होत होत्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा गंभीर आजार नाही. मात्र, यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. रिपोर्टच्या माहितीनुसार, बॉबनं मागच्या वर्षीच हार्ट सर्जरी केली होती. सध्या ते एकदम ठीक आहेत. मात्र, अशाप्रकारे हृदयाचे ठोके कमी जास्त झाल्यानं त्यांच्या जीवाला धोका होता. मात्र, या घड्याळामुळे बॉब वेळीच सावध झाले. त्यामुळे, या गिफ्टसाठी त्यांनी सगळ्यात आधी आपल्या पत्नीचे आभार मानले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heart Attack