कुवेत, 25 जानेवारी : पोलिसांनी एका अनैतिक व्हिडिओच्या आरोपाखाली एका जोडप्याला अटक केली आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस आपल्या पत्नीच्या केसांना कंगवा करताना दिसत आहे. अटकेनंतर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
'अनैतिक' व्हिडिओच्या आरोपावरून या जोडप्यास अटक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हे प्रकरण कुवेतचे आहे. डेली मेलच्या अहवालानुसार, या महिलेचा नवरा हा देशातील अल्पसंख्याक समाजातील (Bidoon) संबंधित असून तो देशाचा नागरिक मानला जात नाही. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी विवाहित जोडप्याच्या घरी जाऊन त्यांना अटक केली. मीडिया रिपोर्टनुसार, महिला व्हिडिओमध्ये अरबी भाषेत काही 'पॉर्न' भाष्य करतानाही दिसली.
पोलिसांनी 21 जानेवारी रोजी पती-पत्नीला अटक केली. देशाच्या कडक शिष्टाचाराच्या कायद्याचे उल्लंघन करत पोलीस आता या जोडप्याचा शोध घेत आहेत. कुवेतच्या एका वृत्तपत्राने अल कबासने म्हटले आहे की, या जोडप्याच्या व्हिडिओवर अश्लिल भाष्य केले आहे. स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की ते कंझर्व्हेटिव्ह कुवेत समाजाचे नियम मोडू देणार नाहीत आणि अशा घटनांमध्ये फौजदारी कारवाई केली जाईल.
इतर बातम्या - मुंबईत पोहोचला धोकादायक कोरोना व्हायरस? रुग्णांच्या चाचण्या आल्या समोर
बिदून समुदायाचे एक लाख लोक कुवेतमध्ये वास्तव्य करतात, परंतु सरकारने त्यांना नागरिकत्व देण्यास नकार दिला आहे. यामुळे, हे लोक राज्य नसलेले (कोणत्याही देशाचे नागरिकत्व नाही) राहतात.
कुवेत सरकार बिदून लोकांना बेकायदेशीर रहिवासी मानते आणि त्यांना आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधादेखील दिल्या जात नाहीत.
इतर बातम्या - फाशी टाळण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत निर्भयाचे आरोपी, आता पुन्हा वापरला पर्याय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.