Home /News /videsh /

पती दुसऱ्या महिलेसोबत झोपेत करत होता प्रेमाच्या गोष्टी; पत्नीने पाहताच उचलले टोकाचे पाऊल

पती दुसऱ्या महिलेसोबत झोपेत करत होता प्रेमाच्या गोष्टी; पत्नीने पाहताच उचलले टोकाचे पाऊल

'माझा नवरा 45 वर्षांचा आहे. झोपेत असताना तो दुसऱ्या महिलेचे नाव घेऊन तिच्याशी बोलत होता आणि प्रेम व्यक्त करत होता.

    नवी दिल्ली, 6 जुलै : पती पत्नीच्या नात्यामध्ये (Husband Wife Relation) कुणी तिसरा आल्यामुळे हे नाते तुटल्याचे अनेक घटना आपण पाहिल्या असतील. मात्र, पत्नीला स्वप्नातच धोका देण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पतीला त्याच्या कर्माची चांगलीच शिक्षा मिळाली आहे. (Wife Punished Husband) ही घटना साऊथ अमेरिकेच्या बोलीविया येथील आहे. या झोपेत असलेल्या पतीने स्वप्नात दुसऱ्या महिलेचे नाव घेतले. यामुळे नाराज झालेल्या पत्नीने झोपलेल्या अवस्थेत असलेल्या पतीवर उकळते पाणी टाकले. याप्रकरणी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पत्नीने स्थानिक माध्यमांना सांगितले की, 'माझा नवरा 45 वर्षांचा आहे. झोपेत असताना तो दुसऱ्या महिलेचे नाव घेऊन तिच्याशी बोलत होता आणि प्रेम व्यक्त करत होता. हे पाहून मला खूप राग आला. यानंतर मी स्वयंपाकघरात गेले आणि उकळत्या पाण्याने भरलेले भांडे आणले आणि ते सर्व उकळते पाणी त्याच्या सर्व अंगावर ओतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उकळत्या पाण्यामुळे पतीचे हात, पाठ, प्रायव्हेट पार्ट आणि शरीराचे इतर भाग गंभीरपणे भाजले होते. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आरडाओरडा ऐकून पतीनेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली की शेजाऱ्यांनी ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवली का, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हेही वाचा - WhatsApp युजर्स चोरट्यांच्या निशाण्यावर; नोकरी आणि फ्री व्हिसाचं आमिष दाखवत असतील तर सावधान! स्पेशल क्राइम फायटिंग फोर्सचे उपसंचालक जुआन जोस म्हणाले, "पतीवर असा प्राणघातक हल्ला त्याच्या पत्नीने करण्याची ही पहिलीच वेळ नाही." यापूर्वीही एका महिलेने पतीवर दारू शिंपडून पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी कोणत्या कारणाने महिलेने रागाच्या भरात पतीवर हल्ला केला होता, हे माहिती नाही. आता मात्र, या महिलेने पतीला पडलेल्या स्वप्नात दुसऱ्या महिलेचे नाव घेतल्याने तिने जर असे पाऊल उचलले असेल तर ते अत्यंत धक्कादायक आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Wife and husband

    पुढील बातम्या