मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पतीच्या प्रेमासाठी त्याच्या मृत्यूनंतर मुलाचा घेतला निर्णय; तो गेल्याच्या 9 महिन्यांनंतर गेले दिवस

पतीच्या प्रेमासाठी त्याच्या मृत्यूनंतर मुलाचा घेतला निर्णय; तो गेल्याच्या 9 महिन्यांनंतर गेले दिवस

महिलेचं पतीवर खूप प्रेम होतं. मात्र कर्करोगामुळे त्याचा अकाली मृत्यू झाला.

महिलेचं पतीवर खूप प्रेम होतं. मात्र कर्करोगामुळे त्याचा अकाली मृत्यू झाला.

महिलेचं पतीवर खूप प्रेम होतं. मात्र कर्करोगामुळे त्याचा अकाली मृत्यू झाला.

    नवी दिल्ली, 27 मार्च : जगात प्रेमाची अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील, पण असं प्रेम कधी पाहिलंय का ? जिथं जोडीदार गेल्यानंतरही त्याचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पत्नी सर्व सीमा पार करते. आयुष्यातील संकटांची भीती मागे सोडून एका महिलेने असाच निर्णय घेतला. 33 वर्षीय लॉरेन हिचं पती क्रिमवर खूप प्रेम होतं. मात्र लग्नाच्या 10 वर्षात त्यांनी मुलाचा विचार केला नव्हता. क्रिसच्या पहिल्या पार्टनरपासून त्यांना मॅकग्रेगर नावाचा मुलगाही आहे. मात्र लॉरेन आणि क्रिस यांना मुलं झालं नव्हतं. काही वर्षांनंतर दोघे याबाबत विचार करू लागले. मात्र 2019 मध्ये अचानक क्रिसला ब्रेन ट्यूमर असल्याचं समोर आलं. याचा त्यांना मोठा धक्का बसला. मात्र लॉरेनला क्रिसचं बाळ हवं होतं. यासाठी त्याने किमोथेरेपी सुरू होण्यापूर्वी क्रिसचं स्पर्म सुरक्षित स्टोअर केलं आणि त्याच्या मृृत्यूच्या 9 महिन्यानंतर प्रॉसेस करवून गर्भवती झाले. मृत्यूपूर्वी दाम्पत्याने येणाऱ्या मुलाची केली होती तयारी एका पॉडकास्ट शोदरम्यान लॉरेनने सांगितलं की, पतीच्या आजाराचा तिच्यावर मोठा परिणाम झाला होता. पतीच्या मृत्यूपूर्वीच त्यांना मूस हवं होतं. मात्र असं होऊ शकलं नाही. 2013 मध्ये क्रिसला ब्रेन ट्यूमर असल्याचं कळालं आणि 2020 मध्ये त्याचा मृत्यू झाला. यादरम्यान अनेकदा त्यांनी मुलाचा विचार केला, मात्र तो बदलला. मात्र 2017 मध्ये लॉरेनने नक्की केलं होतं. क्रिसनंतर लॉरेनला मुलाचा सांभाळ करावा लागणार होता. शेवटी तिने क्रिसचे स्पर्म सेव्ह करण्याचं नक्की केलं. उपचार सुरू होण्यापूर्वीच स्पर्म स्टोअर करणं गरजेचं होतं. त्यानुसार क्रिसच्या मृत्यूनंतर आयव्हीएफच्या मदतीने लॉरेन्सला गर्भधारणा झाली. क्रिसवरील प्रेमासाठी लॉरेनने हा निर्णय घेतला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Cancer, Pregnancy

    पुढील बातम्या