मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बायकोच्या महाभयंकर आजाराबाबत समजताच नवरा हादरला; उचललं टोकाचं पाऊल

बायकोच्या महाभयंकर आजाराबाबत समजताच नवरा हादरला; उचललं टोकाचं पाऊल

फोटो सौजन्य - द सन

फोटो सौजन्य - द सन

बायकोच्या आजाराबाबत समजताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली.

  • Published by:  Priya Lad

लंडन, 23 डिसेंबर : आपल्याला एखादा गंभीर आजार झाला असं निदान झालं की आपल्या पायाखालची जमीनच सरकते. फक्त रुग्णच नाही तर रुग्णाच्या नातेवाईकांनाही बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं. यूकेतील अशाच एका महिलेला खतरनाक आजार झाला आणि तिचा नवरा हादरालात. त्यानंतर त्याने धक्कादायक असं पाऊल उचललं (Husband kill wife diagnosed with cancer).

एशिंगटनच्या नॉर्थम्बरलँड शहरात राहणारे 74 वर्षीय डेव्हिड हंटर. यांची 75 वर्षीय पत्नी जेनिसला कॅन्सर झाला होता. तिला ल्युकेमिया कॅन्सर असल्याचं निदान झालं. ती कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात होती. जिथं उपचार करूनही कॅन्सर बरा होण्याची शक्यता जवळपास नाहीच.

आपल्या बायकोला होणाऱ्या वेदना सहन होत नव्हत्या आणि तिची इच्छा म्हणून  डेव्हिड जेनिसची हत्या केली. आपल्याच हाताने आपल्या बायकोचा जीव घेतला. यानंतर त्याने स्वतःचाही जीव देण्याचा प्रयत्न केला.

हे वाचा - आता Burger खाता खाताच घटवा वजन; McDonald’s ने शोधला सॉलिड उपाय; पाहा VIDEO

द सनच्या रिपोर्टनुसार डेव्हिडने साइप्रस पोलिसांना सांगितलं की,  बायकोला ल्युकेमिया होता. तिला त्या वेदनेत पाहू शकत नव्हतो. शिवाय ती कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात असल्याने तिलाही हेच हवं होतं. त्यामुळे जेव्हा  जेनिस खुर्चीवर आराम करत होती तेव्हाच तिचं नाक आणि तोंड दाबलं. श्वास कोंडल्याने तिचा मृत्यू झाला.

पत्नीची  हत्या केल्यानंतर त्याने आपल्या जवळच्या व्यक्तींना मेसेज केला. आपण आपल्या बायकोची हत्या केली आहे आणि आता आत्महत्या करत असल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. साइप्रस मेलच्या रिपोर्टनुसार  डेव्हिडने झोपेच्या भरपूर गोळ्या घेतल्या. त्यानंतर त्याला पेफोस जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

हे वाचा - कोरोनाच्या दहशतीत टेन्शन फ्री होऊन सणांचा आनंद कसा लुटावा?; तज्ज्ञांच्या टीप्स

डेव्हिड आणि जेनिसच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितलं की दोघंही 52 वर्षांपासून एकमेकांसोबत राहत होते. त्यांच्यात खूप प्रेम होतं. डेव्हिडला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता पुढील कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

First published:

Tags: Cancer, Health, Lifestyle, Uk