मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अपघातात पत्नीचा मृत्यू, आरोपी ड्रायव्हरला पकडण्यासाठी ट्रकला 30 किमीपर्यंत लटकून राहिला नवरा

अपघातात पत्नीचा मृत्यू, आरोपी ड्रायव्हरला पकडण्यासाठी ट्रकला 30 किमीपर्यंत लटकून राहिला नवरा

Brazil Accident News: अपघातात पत्नी जबर जखमी झाली होती आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. पण या इसमाने आरोपीला पकडण्याासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्यात त्याला यश देखील आलं आहे.

Brazil Accident News: अपघातात पत्नी जबर जखमी झाली होती आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. पण या इसमाने आरोपीला पकडण्याासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्यात त्याला यश देखील आलं आहे.

Brazil Accident News: अपघातात पत्नी जबर जखमी झाली होती आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. पण या इसमाने आरोपीला पकडण्याासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्यात त्याला यश देखील आलं आहे.

पेन्हा, 11 मार्च: सामान्य माणूसही दैनंदिन जीवनात कठीण प्रसंगांशी लढा देत असतो, कधीकधी जीवाची बाजी देखील लावावी लागते. अशीच एक घटना ब्राझीलमधील पेन्हा या शहरात घडली. भरधाव जाणाऱ्या ट्रकने एका मोटरसायकलला धडक (Motorbike Accident) मारली. त्या मोटरसायकलवरील पती-पत्नी दोघंही जखमी झाले. पतीने बाइकवर त्या ट्रकचा पाठलाग केला. त्यानी शेवटी ट्रकच्या डाव्या बाजूला पुढे पकडलं. त्याची बाइक सरपटत आणि तो ट्रकला लटकलेल्या अवस्थेत असा त्याने तब्बल 30 किलोमीटर पाठलाग केला आणि शेवटी त्या ड्रायव्हरला पकडण्यात त्या पतीला यश आलं. हा थरार दुसऱ्या एका वाहनचालकाने शूट केला.

ब्राझीलमधील पेन्हा शहरातील बीआर -101 या मोटरवे म्हणजे मोटरसायकलच्या ट्रॅकमधून रविवारी अँडरसन पेरेरा (49) आणि त्याची पत्नी सँड्रा (47) हे दोघे नव्या  मोटरसायकलवरून चालले होते. इतक्यात एक भरधाव ट्रक आला आणि त्यांना जोरदार धडक देऊन पुढे जाऊ लागला. सँड्राला डोक्याला जबर मार लागल्याचं पाहून अँडरसनने त्या ट्रकचा पाठलाग केला. ट्रकला धरण्याच्या प्रयत्नात अँडरसन असताना त्याची मोटरबाइक त्या ट्रकच्या डाव्या बाजूला अडकली आणि तो ट्रकला लटकला.

(हे वाचा-बाइक चालवताना स्टंट करणं पडलं महाग, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक)

भरधाव ट्रकच्या एका बाजूला तो लोंबकळत होता पण त्याने हार मानली नाही. सुमारे 30 किलोमीटर  अंतर ट्रक गेल्यावर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर मोटरबाइक चालकांनी ट्रक चालकाला ट्रक थांबवायला लावला. त्याला खाली उतरवलं आणि चांगला बदडून काढला आणि मग पोलिसांच्या हवाली केलं.  दरम्यान सँड्राला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे ती मृत झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. पण अँडरसनच्या शौर्यामुळे त्याच्या पत्नीचा बळी घेणारा ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात गेला आता त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार  आहे, असं डेली मेलच्या वृत्तात म्हटलं आहे.

(हे वाचा-ना बाईक, ना कार तर या गावातील प्रत्येक घरासमोर एक विमान)

पोलीस अधिकारी उलिम सोअर्स दा सिल्वा यांनी माध्यमांना याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘ट्रक ड्रायव्हर 36 वर्षांचा असून ही घटना घडली तेव्हा तो अमली पदार्थांचं सेवन करून ट्रक चालवत होता. त्याची चाचणी केल्यावर लक्षात आलं की तो ड्रग अॅडिक्ट आहे. पोलीस स्टेशनमध्येही त्याने काहींना चावण्याचा प्रयत्न केला. ड्रगच्या अंमलाखाली तो अतिशय आक्रमक झाला होता त्यामुळे तो बेदरकारपणे ट्रक चालवत होता.’

पोलीस पुढचा तपास करत आहेत. या इसमाचा व्हिडीओ शूट करणारा वाहन चालक आणि इतर बाइक चालकांनी ट्रक ड्रायव्हरला पकडण्यात मदत केली. अँडरसन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्याची प्रकृती सुधारत आहे. या दांपत्याला 26 वर्षांचा मुलगा आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.        

 

First published:

Tags: Shocking viral video, Viral video.