Home /News /videsh /

मँचेस्टर हल्ल्यातील पीडितांच्या मदतीसाठी मँचेस्टरवासीयांनी काढला टॅटू

मँचेस्टर हल्ल्यातील पीडितांच्या मदतीसाठी मँचेस्टरवासीयांनी काढला टॅटू

30 मे : हजारो लोक मँचेस्टर इथे एकत्र जमले होते ते टॅटू काढायला. हा होता मधमाशीचा टॅटू. पण गंमत म्हणून एवढे सगळे टॅटू काढत नव्हते. तर मँचेस्टर इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांसाठी निधी उभारण्यासाठी  टॅटू काढले. हा टॅटू मधमाशीचाच का? तर मधमाशी मँचेस्टरच्या औद्योगिक क्रांतीचं प्रतिक आहे. मँचेस्टर नागरिक किती कष्टाळू आहेत, याचं प्रतिक. नागरिकांनी आपली एकजूट दाखवण्यासाठी ही टॅटू मोहीम केली. टॅचू काढण्यासाठी त्यांनी संस्था स्थापन केली. एका टॅटूची किंमत 50 डाॅलर्स होती. सर्वच नागरिकांनी टॅटू मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिला आणि दहशतवाद्यांना अनोख्या पद्धतीनं उत्तर दिलं.
First published:

Tags: Tattoo

पुढील बातम्या