Home /News /videsh /

चीनकडून विगर जातीच्या मुसलमानांचा नरबळी? अमेरिकेचा धक्कादायक आरोप

चीनकडून विगर जातीच्या मुसलमानांचा नरबळी? अमेरिकेचा धक्कादायक आरोप

या महिलांवरही चीन अत्याचार करीत असल्याचे सांगितले जात आहे.

    वॉशिंग्टन, 17 ऑक्टोबर : चीनमध्ये विगर जातीच्या मुसलमानांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याचा आरोप अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी केला आहे. शिंजियांग प्रांतातील मुसलमानांचे चीन नरसंहार करत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अस्पेन इन्स्टिट्यूट द्वारा आयोजित करण्यात आलेल्या एका ऑनलाईन कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ'ब्रायन यांनी हा आरोप केला आहे. यावेळी आरोप करताना त्यांनी हे जर नरसंहार नसेल तर याचसारखे काहीतरी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेदेखील याआधी आरोप करत शिंजियांगमध्ये 10 लाख विगर मुसलमानांना चीनने ताब्यात घेतल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे चीनने हे आरोप नाकारले असून याठिकाणी शिबिरांमध्ये त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात असल्याचे म्हटले आहे. पण यासंबंधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यकर्त्यांनी हे मानवतेच्या दृष्टीने चुकीचे असून नरसंहार होत असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने चीनच्या विगर मुसलमान आणि अन्य मुसलमानांवर होणाऱ्या अत्याचाराची आणि कृत्याची निंदा केली आहे. तसेच चीनमधील अधिकाऱ्यांवर देखील बंदी घातली आहे. परंतु अमेरिकेने अधिकृतपणे चीनच्या या कृत्याला नरसंहार म्हटलं नसून त्यांच्याकडे संबंधातील पुरावे देखील असणे गरजेचे आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी या आधीही या घटना भयानक असल्याचं म्हटलं होतं. चीन शिंजियांगमध्ये जबरदस्ती नसबंदी, गर्भपात आणि परिवार नियोजनाच्या शस्त्रक्रिया करत असल्याचे देखील माईक पॉम्पिओ यांनी म्हटले होते. त्याचबरोबर नरसंहारासारखे गंभीर आरोप करताना अमेरिकेला खूप सावध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते. हे ही वाचा- कस्टम विभागाने पकडले प्रॉडक्ट या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये चीन विगर जातीच्या महिलांच्या केसांपासून वस्तू तयार करत असल्याचा आरोप देखील केला आहे. मुस्लीम महिलांचं केशवपन करून त्या केसांपासून या वस्तू तयार केल्या जात आहेत. अमेरिकेच्या कस्टम विभागाने अशा मानवी केसांपासून तयार झालेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. त्यामुळे हा संशय अधिक बळावत आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: China, United States of America

    पुढील बातम्या