Home /News /videsh /

इथे महिला कैद्यांवर होतो बलात्कार; जेलमधलं भयंकर वास्तव एका रिपोर्टमधून आलं समोर

इथे महिला कैद्यांवर होतो बलात्कार; जेलमधलं भयंकर वास्तव एका रिपोर्टमधून आलं समोर

उत्तर कोरियातल्या (North Korea) जेमधलं भयंकर वास्तव Human Rights Watch या संस्थेच्या ताज्या रिपोर्टमधून समोर आलं आहे.

    प्योंगयांग, 20 ऑक्टोबर :  ह्युमन राईट्स वॉच (Human Rights Watch) नावाच्या संस्थेने उत्तर कोरियाच्या (North Korea) जेलमध्ये बंद असणाऱ्या कैद्यांना किती अमानुष वागणूक दिली जाते आणि त्यांचा कसा छळ होतो यावरचा पर्दाफाश केला आहे. या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये उत्तर कोरियातलं भयंकर वास्तव जगासमोर आणलं आहे. या देशात कारागृहात मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या संस्थेने उत्तर कोरियाच्या माजी अधिकारी आणि कैद्यांबरोबर चर्चा करून हा 88 पानांचा रिपोर्ट तयार केला आहे. 2011 मध्ये उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी उत्तर कोरियाची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची आणि कैद्यांची स्थिती वाईट झाल्याचंदेखील यामध्ये म्हटलं आहे. या रिपोर्टमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कार्यकर्त्यांनी किम जोंग उन आणि त्याच्या सुरक्षा प्रमुखाच्या अत्याचारांची आणि जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या काळात झालेल्या अत्याचारांची तुलना केली आहे. यामध्ये कैद्यांना उपाशी ठेवलं जात असून त्यांची हत्यादेखील केली जात  असल्याचं समोर आले आहे. माजी अधिकारी आणि कैद्यांबरोबर चर्चा करून तयार केला रिपोर्ट हा रिपोर्ट उत्तर कोरियातील 8 माजी सरकारी अधिकारी आणि 22 कैद्यांशी बोलून तयार करण्यात आला आहे. या जेलमध्ये कैद्यांशी जनावरांसारखा व्यवहार होत असल्याचं म्हटलं आहे. या संस्थेचे आशियाचे निदेशक ब्रॅड अॅडम्स यांनी याविषयी सांगितले, कैदयांना येथील सिस्टीमची भीती वाटत असून यामध्ये एकदा अडकल्यानंतर ते लाच देऊनच ते बाहेर येऊ शकतात. खाली डोकं वर पाय करून 16 तास बसावं लागतं या तुरुंगातून यातना सहन करून बाहेर पडलेल्या कैद्यांनी जेलमधील या परिस्थितीविषयी माहिती देताना या ठिकाणी 7 ते 16 तास खाली डोकं वर पाय करून बसावं लागत असल्याचं सांगितलं. जर आपण असं केलं नाही तर गार्ड काहीही शिक्षा देऊ शकतात. एका कैद्यानी संगितलं, पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला असताना पकडला गेल्यानंतर त्याचा दररोज इतका छळ होत असे की, त्याला आपण शिक्षेमुळेच मरू की काय असं वाटायचं. महिला कैद्यांवर बलात्कार आणि अत्याचार एका माजी व्यावसायिक महिला कैद्याने तिच्यावर तुरुंगात बलात्कार झाल्याचं सांगितलं. त्याचबरोबर लैंगिक अत्याचार झाल्याचंदेखील तिनी सांगितलं. त्याचबरोबर चौकशीच्या नावाखाली कैद्यांना मारहाण केली जात असल्याची माहिती देखील एका माजी अधिकाऱ्याने दिली आहे.जेलच्या मॅन्युअलमध्ये कैद्यांना मारहाण न करण्याविषयी नियम आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं.  तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका कैद्याने सांगितले, मला इतकी मारहाण करण्यात आली की, मी भीतीपोटी गुन्हा कबूल केला. त्याचबरोबर अतिशय गलिच्छ ठिकाणी ठेवलं जात असून जेवणदेखील खूप कमी दिलं जात असल्याचं त्यानी सांगितलं. महिला कैद्यांना त्यांच्या गरजेचं सामान दिलं जात नसल्याचेदेखील त्याने या वेळी सांगितलं. त्याचबरोबर कमी जागेत जास्त कैद्यांना ठेवलं जात असून आंघोळीसाठी आणि झोपण्यासाठी देखील वस्तू दिल्या जात नसल्याचे त्याने सांगितलं.
    First published:

    Tags: North korea

    पुढील बातम्या