S M L

...म्हणून पाकिस्तानात वाढत आहेत हिंदू मतदार

जगभरात सर्वात जास्त हिंदू राहणाऱ्या देशांमध्ये सध्या पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे

Updated On: Jul 16, 2018 05:35 PM IST

...म्हणून पाकिस्तानात वाढत आहेत हिंदू मतदार

पाकिस्तानात 25 जुलैला सार्वत्रिक निवडणुका आहेत. या निवडणुकांच्याआधी इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान (ईसीपी) ने मतदारांची मोजणी केली. या मतमोजणीनुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये पाकिस्तानात असलेल्या गैर मुस्लिमांच्या संख्येत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात सर्वाधिक हिंदू मतदार आहेत. हिंदूंच्या मतांमुळे अनेक ठिकाणी सत्ताबदल होऊ शकते याची जाणीव असल्यामुळे पाकिस्तानातील प्रत्येक पक्ष हिंदूंचे मत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतो. पाकिस्तानातील संसदेत 10 जागा या अल्पसंख्यांकांसाठी राखीव असतात. त्यातील सहा जागांवर हिंदू नेता निवडून येतात.

ईसीपीच्या वेबसाइटवर दिलेल्या आकड्यांनुसार, 2013 मध्ये झालेल्या निवडणुकांवेळी हिंदूंची संख्या 14 लाख होती. तर 2018 मध्ये ही संख्या 17.7 लाख एवढी झाली आहे. पाकिस्तानातील हिंदूंमध्ये 3 लाख 70 हजारांची वाढ झाली आहे. पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांक आहेत. जगभरात सर्वात जास्त हिंदू राहणाऱ्या देशांमध्ये सध्या पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. पण पाकिस्तानात अशाच पद्धतीने हिंदूंची वाढ होत राहिली तर 2050 पर्यंत सर्वाधिक हिंदू असलेल्या देशांमध्ये पाकिस्तान चौथ्या स्थानावर येईल.

पाकिस्तान निवडणुक आयोगाने मतदारांना जागरुक करण्यासोबतच नवे मतदार जोडण्यावरही अधिक भर दिला. 'पाकिस्तान पिपल्स पार्टी' (पीपीपी) आणि इम्रान खान यांची 'पाकिस्तान तहरीक ए इंसाफ' (पीटीए) या दोन्ही पक्षांनी मतदारांना जोडण्याचे प्रयत्न केले. नवे मतदार आपल्याच पक्षाशी जोडले जावे असे या दोन्ही पक्षांना वाटत असल्यामुळे आयोगासोबत त्यांनी नव्या मतदारांची नोंदणी करण्याचे अभियान सुरू केले.

हेही वाचाः

Loading...
Loading...

...तर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंवर एफआयआर करेन - संजय निरुपम

'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2018 05:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close