Home /News /videsh /

मलाला युसूफ कशी ठरली सर्वात मोठा पुरस्कार मिळवणारी सर्वांत कमी वयाची व्यक्ती

मलाला युसूफ कशी ठरली सर्वात मोठा पुरस्कार मिळवणारी सर्वांत कमी वयाची व्यक्ती

मलाला युसुफ ही नोबेल पुरस्कार मिळवणारी सर्वांत तरूण व्यक्ती ठरली आहे. तिची संघर्ष कथा आणि तिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. जाणून घ्या या मागचा इतिहास.

    नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : मलाला युसुफ ही नोबेल पुरस्कार मिळवणारी सर्वांत तरूण व्यक्ती ठरली आहे. तिची संघर्ष कथा आणि तिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. तिला अत्यंत लहान वयात मोठा पुरस्कार मिळाला, जाणून घ्या या मागचा इतिहास. स्वीडनमधील केमिस्ट अल्फ्रेड नोबेल यांनी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जगभरातील व्यक्तींना पुरस्कार देण्याची इच्छा मृत्युपत्रात व्यक्त केली होती. 27 नोव्हेंबर 1895ला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 1901 मध्ये जागतिक नोबेल पुरस्कार द्यायला सुरूवात झाली. त्यांच्या इच्छेप्रमाणे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांततेसाठी हा पुरस्कार बहाल करण्यात येतो. 113 वर्षांनी मलाला युसुफ या सर्वांत तरूण व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला. तिची कथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षणासाठीचा तिचा लढा आणि त्यातून तिच्या वयाच्या सर्व तरुणींना हक्क मिळवून देण्यासाठी व्यवस्थेशी असलेला तिचा लढा, प्रेरणादायी ठरला. पाकिस्तानातील मुलीने तालिबानी दहशतवादाच्या छायेत जगताना त्यांचे कष्ट आणि त्यांचा त्रास याबाबत ब्लॉग लिहावा, असं बीबीसीला वाटत होतं. मात्र,जीवाला धोका असल्यामुळे कुणी तसं करायला तयार झालं नाही. बीबीसीचे प्रतिनिधी आणि स्वात खोऱ्यात शालेय शिक्षक असलेल्या झियाउद्दीन युसफझाई यांनी त्यावेळी आपल्याच परिवारात आपलीच मुलगी यावर लिहू शकते, असं सुचवलं आणि तेव्हपासून मलाला डायरी लिहू लागली. तिच्या या नोट्स बीबीसीने २००९ मध्ये प्रकाशित केल्या. त्या वर्षी तालिबानने सर्व मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्याचे आदेश काढले होते. तिचं टोपणनाव तिची ओळख लपवू शकलं नाही, आणि ती मलालाच असल्याचं तालिबानने ओळखलं होतं. हे वाचा - NOBEL PEACE Prize 2020 : ट्रम्प यांना नाही मिळालं शांततेचं नोबेल त्यानंतर मलाला शाळेतून परतत असताना बंदूकधारी दहशतवाद्यांनी त्यांच्या वाहनांवर हल्ला केला. या वाहनात अनेक मुली होत्या. यावेळी मलालाच्या डोक्यात आणि मानेवर गोळी लागली होती. तिला लंडनला उपचारांसाठी नेण्यात आलं. तिचा मुलींच्या शिक्षणासाठीचा लढा जागतिक पातळीवर पोहोचला होता. या हल्ल्यानंतरही दोन वर्षांनी तिचा लढा, तिचं आंदोलन सुरूच राहिलं. लंडन येथे रसायनाशास्त्राच्या वर्गात अचानक तिच्या शिक्षकांनी येऊन, मलाला ही सर्वात कमी वयाची नोबेल पुरस्कार मिळवणारी व्यक्ती ठरल्याची बातमी दिली. हा पुरस्कार भारतातील मुलांच्या हक्कांसाठी लढा देणारे कार्यकर्ते कैलास सत्यर्थी आणि मलाला या दोघांना एकत्रित बहाल करण्यात आला होता. कैलास सत्यार्थी यांना मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीच्या लढ्याला यश म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. मलालाच्या या लढ्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने एक पत्र काढून पाकिस्तानात मुलींचं शिक्षण पुर्ववत करण्यास सांगितलं. त्यानंतर मलालाने यूएनएमध्ये भाषण दिलं. कोट्यवधी मुलींसाठी तिचा लढा प्रेरणादायी ठरला. तिने स्थापन केलेली शाळा आता लेबनॉन येथे मुलींना शिक्षण तसंच मोफत पुस्तकं पुरवते.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या