Home /News /videsh /

बायडन सत्तेत आल्यानंतर काय असेल अमेरिकेची काश्मीरबद्दल भूमिका?

बायडन सत्तेत आल्यानंतर काय असेल अमेरिकेची काश्मीरबद्दल भूमिका?

अमेरिकेतील सत्तापालटाचा थेट परिणाम त्यांच्या भारताशी असलेल्या संबंधांवर होतो. डेमोक्रॅटिक नेते जो बायडन (Joe Biden) अमेरिकेचे अध्यक्ष आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) उपाध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेच्या काश्मीरविषचीच्या भूमिकेत काही बदल होतील?

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 नोव्हेंबर : अमेरिकेतील सत्तापालटाचा थेट परिणाम त्यांच्या भारताशी असलेल्या संबंधांवर होतो. डेमोक्रॅटिक नेते जो बायडन (Joe Biden) अमेरिकेचे अध्यक्ष आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) उपाध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेच्या काश्मीरविषचीच्या भूमिकेत काही बदल होतील? भारताच्या दृष्टीने अमेरिकेतील सत्तापालट काश्मीर संदर्भाने हिताचा ठरणार की ट्रम्प गेल्यामुळे नुकसान होणार? बायडन आणि हॅरिस सत्तेत आल्यानंतर भारताकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या गेल्या. एका बाजूला असं म्हटलं गेलं की, हॅरिस भारतीय वंशाच्या असल्याने त्यांचा भारताकडे कल असेल, त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध अमेरिकेची भारताला साथ मिळेल. दुसरीकडे अशी थिअरी मांडली गेली की काश्मीर हा मुद्दा अमेरिकी राजकारणात मानवी अधिकारांशी संबंधित आहे, त्यामुळे अमेरिका सावकाश पावलं टाकतोय. बघूया हे काय प्रकरण आहे. काश्मीबद्दल ट्रम्प आणि बायडन यांची मतं ट्रम्प 2016 ला अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांनी आपण हिंदूत्वाचा फॅन असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे भारतातील भाजप सरकारने त्यांचं कौतुक केलं होतं. ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींनी एकमेकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम आयोजित केले. अमेरिकेने भारत-पाकिस्तान चर्चेत मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आणि मानवाधिकार उल्लंघन आणि नागरिकत्व संशोधन कायद्याबाबत भारताला पाठिंबा दिला नाही. दुसरीकडे 370 कलम काढून टाकल्यावर हॅरिस म्हणाल्या, 'काश्मिरींनी स्वत: ला एकटं समजू नये. या प्रकारावर लक्ष ठेवलं जातंय आणि वेळ पडेल तेव्हा हस्तक्षेपही केला जाईल.' बायडन यांच्या निवडणूक प्रचारात डेमोक्रॅटिक अजेंड्यात एनआरसी आणि काश्मीर हे दोन्ही मुद्दे मुस्लिमांसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं होतं. काश्मीरमधील नागरिकांचे अधिकार निश्चित करण्यासाठी भारत सरकारनी अनेक पावलं उचलायची आवश्यकता आहे. असंतोष दाबून ठेवणे, शांतपणे निषेध करणाऱ्यांना थांबवणं, इंटरनेट बंद करणं अशा गोष्टींमुळे लोकशाही कमकुवत होते, असा उल्लेख बायडन यांच्या निवडणुकीतील अजेंड्यात होता. काश्मिरींना काय वाटतं? काश्मीरमध्ये दररोज घडणाऱ्या घटनांवर अमेरिकेचं लक्ष असतं, असं 1990 पासून बोललं जातं. काश्मीरमध्ये दहशतवाद सर्वोच्च पातळीला पोहोचला असताना दिल्ली, इस्लामाबादमध्ये जशी शक्तीकेंद्र आहेत तसंच अमेरिकेतही आहेत, असंही म्हटलं जात होतं. पण गेल्या काही काळापासून अमेरिकेने काश्मीरच्या प्रश्नात नाक खुपसणं कमी केलं आहे. काश्मीरबाबत अमेरिकेने केलेल्या चुका बायडन सरकार सुधारेल असं, काही अमेरिकींना वाटतं. पण 2019 मध्ये काश्मीरबाबत भारत सरकारने घेतलेल्या निर्णयांनंतर जगभराने प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे काश्मिरी निराश झाले असून त्यांना आशाच राहिलेली नाही, असा सूरही उमटत आहे. काय असेल अमेरिकेची भूमिका? ट्रम्प गप्प राहिले, पण अमेरिकन संसदेनी प्रश्नांची उत्तरं मागितली त्यामुळे भूमिका संतुलित राहिली. तसंच संतुलन आता नव्या सरकारच्या काळातही दिसेल अशी अपेक्षा आहे. अमेरिकेच्या काही अडचणी जाणून घेऊ. 1. अमेरिकेला दक्षिण आशियात चीनविरुद्ध रणनीती तयार करायची आहे. ट्रम्प सरकारच्या काळात अमेरिका चीन युद्धापर्यंत पोहोचले होते त्यामुळे बायडन यांच्यासमोर हे संबंध सुधारण्याचं आव्हान असेल. त्यामुळे ट्रेड वॉर संपवून दक्षिण आशियात आपलं वर्चस्व निर्माण करण्याचं आव्हानही त्यांच्यासमोर आहे. 2. भारतातील बाजारपेठ अमेरिकेच्या दृष्टिनी महत्त्वाची आहे, तसंच चीनविरुद्ध भारताचा पाठिंबाही महत्त्वाचा आहे त्यामुळे भारताला एकदम दुखवणं अमेरिकेच्या हिताचं नाही. एकूणच राजकीय पंडितांचं मत आहे की, अमेरिका समतोल राखेल आणि काश्मीरमध्ये केवळ मानवाधिकारांचा मुद्दा मांडत राहील. बायडन त्यांच्या निवडणूक अजेंड्यातील मुस्लिमांच्या लांगुलचालन करतना भारतसंबंधी मुद्द्यांबाबत कृती करणार नाही, त्यामुळे ते भारताला विरोध करणार नाहीत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या