मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

सणकी घरमालक! हातावरचे TATOO न आवडल्याने भाडेकरू तरुणीची हकालपट्टी

सणकी घरमालक! हातावरचे TATOO न आवडल्याने भाडेकरू तरुणीची हकालपट्टी

भाडेकरू तरुणीच्या हातावरचे टॅटू न आवडल्यामुळे (House owner told girl to leave just as he didn't like tatoo on her hand) सणकी घरमालकाने भाडेकरू तरुणीची हकालपट्टी केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

टोरँटो, 21 सप्टेंबर : भाडेकरू तरुणीच्या हातावरचे टॅटू न आवडल्यामुळे (House owner told girl to leave just as he didn't like tatoo on her hand) सणकी घरमालकाने भाडेकरू तरुणीची हकालपट्टी केल्याची घटना समोर आली आहे. परक्या शहरात शिक्षणासाठी (Education) आलेल्या या तरुणीला आपल्यासोबत असा प्रकार होईल, याची पुसटशीदेखील कल्पना आली नाही. शिक्षण सोडून आता तिच्यावर नवीन घर शोधण्याची वेळ आली आहे.

शिक्षणासाठी आली होती तरुणी

कॅनडातील टोरँटो शहरात मेडिकलसाठी प्रवेश मिळाल्यामुळे कँडिस बॉल ही तरूणी शहरात भाड्याची जागा शोधत होती. ऑनलाईन सर्व्हिसचा वापर करून तिने एक जागादेखील नक्की केली. त्या घरात ती राहायला येणार, हे निश्चित झालं. घरमालकासोबत करार झाला आणि ऍग्रिमेंटदेखील झालं. मात्र जेव्हा कँडिस या घरात राहायला आली, तेव्हा घरमालकानं तिला घर सोडण्याची सूचना केली.

कँडिसला धक्का

शिक्षणासाठी परक्या शहरात येणं, हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक आव्हान असतं. त्यातही राहण्यासाठी जागा शोधणं हे सर्वात मोठं काम असतं. एकदा जागा मिळाली, की ती टिकवून ठेवणं हेदेखील मोठं काम ठरतं. मात्र घरात राहायला आल्याच्या दुसऱ्याच दिवशी कँडिसला तिच्या घरमालकाने घर सोडायला सांगितल्यामुळे तिला धक्का बसला.

हे वाचा - खरंच की काय! साडी नेसल्यामुळे महिलेला रेस्टॉरंटमध्ये नाकारला प्रवेश, पाहा VIDEO

मालकांना तिने कारण विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी काहीही सांगायला नकार दिला. तातडीने घर सोडून जाण्याची आणि आपल्या समोरही न येण्याची विनंती त्यांनी कँडिसला केली. लवकरात लवकर आपलं सामान घेऊन घरातून निघून जाण्याची सूचना त्यांनी केली. त्यामुळं कँडिसला नाईलाजानं घर सोडावं लागलं. मात्र घर सोडण्यापूर्वी त्यामागचं कारण जाणून घेण्याचा चंग तिने बांधला आणि घरमालकांना कारण सांगण्याची विनंती केली.

कारण ऐकून बसला धक्का

कँडिसच्या हातावर असलेले टॅटू हेच घरमालकांच्या निर्णयामागचं कारण असल्याचं तिला समजलं. कँडिसच्या हातावर वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू काढलेले होते. घरमालकाला हे टॅटू पसंत नव्हते. हे टॅटू पाहून आपल्याला भीती वाटत असल्याचं त्यानं सांगितलं. घरात राहताना जेव्हा जेव्हा कँडिस समोर येईल, तेव्हा तेव्हा आपल्याला हे टॅटू दिसतील आणि भीती वाटत राहिल, असं वाटल्याने त्याने कँडिसला हाकलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने कँडिसला धक्का बसला असून घरमालकाच्या सणकीपणाचा रागदेखील आला आहे.

First published:

Tags: Canada, Woman