Home /News /videsh /

UAE चं होप यान पोहोचलं मंगळाच्या कक्षेत, ही कामगिरी करणारा पहिलाच अरब देश

UAE चं होप यान पोहोचलं मंगळाच्या कक्षेत, ही कामगिरी करणारा पहिलाच अरब देश

माणसाला नेहमीच अवकाशातील इतर ग्रहांबाबत कुतूहल राहिलेलं आहे. त्यातूनच विविध अवकाशमोहिमा सुरू असतात.

    नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी: संयुक्त अरब अमिरात (United Arab Emirates) अर्थात युएईनं (UAE) मंगळावर पोहोचणारा जगातला पहिला अरब देश (first Arab country to reach Mars) होण्याचा मान मिळवला आहे. होप प्रोब (hope probe) असं या देशाच्या मंगळ मोहिमेचं (mission mars) नाव आहे.(Arabs to Mars) होप या यानानं संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमाण वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी 7. 42 वाजता पृथ्वीकडं सिग्नल पाठवले. यानानं मंगळाच्या कक्षेत (mars orbit) प्रवेश करण्यात यश मिळवलं. हे सिग्नल्स (signals) मिळताच दुबईच्या मोहम्मद बिन रशीद अवकाश केंद्रावर मोठा जल्लोष करण्यात आला. तज्ज्ञांच्या मते हे यान यशस्वीपणे मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याची शक्यता 50% होती. दुबईचे (Dubai) शासक मोहम्मद बिन राशिद बिन मखतूम आणि अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद यांनी वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. तब्बल सहा वर्षांच्या अथक मेहनतीनंतर 200 मिलियन डॉलर्स खर्चून उभी केलेली ही मोहिम यशस्वी झाली. युएईचं हे यान 1,20,000 किलोमीटर प्रती तास या वेगानं कार्यरत आहे. मंगळाच्या गुरुत्वाकर्षण बलाशी समन्वय साधता यावा यासाठी युएईच्या वैज्ञानिकांनी अवकाश यानाचं इंजिन जवळपास 27 मिनिट सुरू ठेवलं. युएईचं होप यान पुढचे काही महिने मंगळ ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करेल. युएईच्या या मोहिमेचा अजून एक हेतू म्हणजे मंगळ ग्रहाचा पहिला ग्लोबल मॅप तयार करणं. हे यान तयार करताना वैज्ञानिकांना सर्वाधिक धोका वाटत होता तो त्याच्या वेगाचा. त्यांना काळजी होती, की जर अवकाशयान अधिक वेगानं गेलं तर ते मंगळ ग्रहापासून दूर निघून जाईल आणि हळू गेलं तर ते मंगळ ग्रहावर नष्ट होऊन जाईल. मात्र युएईच्या वैज्ञानिकांनी या सगळ्यावर नियंत्रण मिळवत अवकाशमोहीम यशस्वी केली. वैज्ञानिक मानतात, की युएईसह अमेरिका (America)आणि चीनचं (China) यानही मंगळावर पोहोचणं हे जगात याबाबत वाढलेल्या स्पर्धेचं निदर्शक आहे. जगातले महाशक्ती असलेले देश आपलं वर्चस्व आणि दबदबा यामाध्यमातून सिद्ध करू पाहत आहेत. केवळ अमेरिका हाच जगातील एकमेव देश आहे जो आजवर मंगळाच्या पृष्ठभागावर यान उतरवण्यात यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनं आजवर तब्बल आठवेळा ही कामगिरी केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Space Centre, UAE

    पुढील बातम्या