S M L

माझी फिगर, "दर 10 मिनिटाला एका तरुणीची हत्या"

"या स्पर्धेदरम्यान एका राऊंडमध्ये सहभागी माॅडेलला आपली फिगर साईज सांगायची होती. पण..."

Sachin Salve | Updated On: Nov 2, 2017 11:34 PM IST

माझी फिगर,

02 नोव्हेंबर : दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये एका सौंदर्य स्पर्धेदरम्यान अशी घटना घडली की ज्यामुळे अवघं माॅडेलिंग जगताला हादरा बसलाय.

मिस पेरू सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालेल्या  माॅडेल्सनी ज्युरीसमोर आपली बाॅडी फिगर सांगण्याऐवजी त्यांनी महिलांवर होणाऱ्या गुन्ह्याचे आकडेच सांगितले.

मग, काय ज्युरीसह सर्वच प्रेक्षक अवाक् झाले. विशेष म्हणजे हा शो लाईव्ह सुरू होता. त्यामुळे सर्वत्र झालेल्या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. पण ज्या प्रकारे या माॅडेल्सनी उत्तरं दिली त्याचं आता सर्वत्र कौतुक होतंय.

स्पर्धेदरम्यान एका राऊंडमध्ये सहभागी माॅडेलला आपली फिगर साईज सांगायची होती. पण या पैकी पहिल्या माॅडेलने शहरात हर 10 मिनिटात एका तरुणीची हत्या होते.

तर दुसऱ्या माॅडेलने 70 टक्के महिला रस्त्यावर छेडछाडीच्या बळी ठरताय असं उत्तर दिलं.

Loading...
Loading...

विशेष म्हणजे आजपर्यंत अशा स्पर्धेमध्ये कधीही कोणत्याही माॅडेलने अशी उत्तर दिली नाही. त्यामुळे या माॅडेल चर्चेच्या विषय ठरल्यात.

या स्पर्धेचे आयोजक जेसिका न्यूटनने सांगितलं की, "मिस पेरू स्पर्धेत सर्व सहभागी माॅडेल महिलांच्या प्रतिनिधी आहे. त्यांना समाजात होणाऱ्या महिलांवर अत्याचाराचा खरा चेहरा समोर आणलाय. आज पण अशा प्रसंगातून सामोरं गेलेल्या महिला पुढे येत नाही. हा त्यांचा आवाज होता आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आम्ही तुमच्यासोबत आहोत"

पेरू शहरात महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झालीये. मागील वर्षी 2016 मध्ये देशाची राजधानी लीमामध्ये महिला अत्याचाराविरोधात लोकं मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 2, 2017 10:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close