हिटलरची सही असलेल्या 'माईन काम्फ' आत्मकथेचा 8.32 लाखाला लिलाव

हिटलरची सही असलेल्या 'माईन काम्फ' आत्मकथेचा 8.32 लाखाला लिलाव

या आत्मकथेच्या पहिल्या पानावर हिटलरची स्वाक्षरी आहे. या स्वाक्षरीखाली "युद्धामध्ये फक्त महान व्यक्तीच जिंवत राहतील!" 18 आॅगस्ट 1930 अडाॅल्फ हिटलर" असं वाक्यही दस्तरखुद्द हिटलरने लिहिलंय.

  • Share this:

18 सप्टेंबर : जर्मनीचा हुकूमशहा अडाॅल्फ हिटलरची आत्मकथा 'माईन काम्फ' (माझा लढा) ची अखेर विक्री झालीये. अमेरिकेत 8.32 लाखांना लिलावात हिटलरची स्वाक्षरी असलेली ही प्रत विकली गेली आहे.

या आत्मकथेच्या पहिल्या पानावर हिटलरची स्वाक्षरी आहे. या स्वाक्षरीखाली "युद्धामध्ये फक्त महान व्यक्तीच जिंवत राहतील!" 18 आॅगस्ट 1930 अडाॅल्फ हिटलर" असं वाक्यही दस्तरखुद्द हिटलरने लिहिलंय.

अमेरिकेतील एलेक्सझेंडर लिलावानुसार, ज्या दिवशी हिटलरने या पुस्तकावर स्वाक्षरी केली होती, तेव्हा त्या दिवशी तो जर्मनीच्या कोलोग्नेमध्ये राष्ट्रीय निवडणुकीसाठी जर्मन वर्कस पार्टी आणि पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासभेत भाषण देत होता.

सन 1933 पासून 1945 पर्यंत जर्मनीचा हुकूमशहा राहिलेल्या हिटलरने नोव्हेंबर 1923 मध्ये राजकीय अटकेत जेलमध्ये असताना या पुस्तकाला लिहण्यास सुरुवात केली होती. हे पुस्तक हेस लिहत होता. पुस्तक लिहीत असताना ही आत्मकथा दोन भागात असावी असा विचार हिटलरने केला होता.

लँड्सबर्ग जेलचे अधिक्षकाच्या माहितीनुसार, या आत्मकथेचं अनेक भागात प्रकाशन होईल आणि त्या कमाईत कोर्ट कचेरीचा खर्च निभावला जाईल अशी आशा हिटलरला होती. या आत्मकथेत हिटलरची राजकीय विचारधारा आणि जर्मनीसाठी केलेल्या उपाययोजनेचा उल्लेख होता.

इतिहासकारांच्या माहितीनुसार, हिटलर सुरुवातील आपल्या आत्मकथेचं नाव "खोट्या, मुर्ख आणि भित्र्यापणाच्या विरोधात साडेचार वर्षांचा लढा' असं ठरवलं होतं. पण हिटलरला मॅक अमानजो याने 'माईन काम्फ' नाव देण्याचा सल्ला दिला. मॅक अमानजो हा फ्रेन्च हर वर्लेगचा प्रमुख होता आणि त्यानेच हिटलरची आत्मकथा प्रकाशित केली होती.

( सौजन्य -वृत्तसंस्था)

First published: September 18, 2017, 10:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading