इस्लामाबाद, 1 जुलै : पाकिस्तान लष्कराने मेजर जनरल निगार जोहर यांची पहिली महिला लेफ्टनंट जनरल म्हणून नियुक्ती केली आहे. पाकिस्तान सैन्याच्या मीडिया विंगने मंगळवारी याबाबत माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, प्रथमच पाकिस्तान लष्कराने लेफ्टनंट जनरल पदासाठी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. निगार जोहर यांना लेफ्टनंट जनरल म्हणून नियुक्त केले आहे. मेजर जनरल निगार जोहर यांना थ्री-स्टार जनरल म्हणून प्रतिष्ठित पद मिळाले आहे, तर त्यांना पाकिस्तान लष्कराच्या पहिल्या महिला सर्जन जनरलपदीही नियुक्त करण्यात आले आहे.
हे वाचा-
Major General Nigar Johar, HI (M) promoted as Lieutenant General.
She is the 1st female officer to be promoted as Lieutenant General. The officer has been appointed as 1st female Surgeon General of Pak Army. Lieutenant General Nigar Johar hails from Panjpeer, District Swabi KPK. pic.twitter.com/ytw8YvSz76
— DG ISPR (@OfficialDGISPR) June 30, 2020
आयएसपीआरचे महासंचालक यांनी केलं ट्विट
लेफ्टनंट जनरल म्हणून पदोन्नती झालेल्या पहिल्या महिला अधिकारी असल्याची माहिती आंतर-सेवा जनसंपर्क (आयएसपीआर) महासंचालक, मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी पाक सैन्याच्या पहिल्या महिला सर्जन जनरल म्हणून नियुक्त केल्याचे लिहिले आहे.
जोहर यांनी 1985 मध्ये रावलपिंडीच्या आर्मी मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि आर्मी मेडिकल कोरमध्ये रुजू झाल्या. सन 2017 मध्ये, त्या मेजर जनरल पद मिळविणाऱ्या पाकिस्तानी लष्करातील तिसऱ्या महिला अधिकारी बनल्या. त्यांच्याखेरीज शाहिदा बादशाह आणि शाहिदा मलिक या दोन महिला प्रमुख जनरल पदावर होत्या. जोहर यांचे वडील आणि पती दोघेही सैन्यात अधिकारी म्हणून काम करत आहेत.
संपादन - मीनल गांगुर्डे