पाकिस्तानातील सिंध मंदिरावर हल्ला, देवीच्या मूर्तीची तोडफोड

पाकिस्तानातील सिंध मंदिरावर हल्ला, देवीच्या मूर्तीची तोडफोड

सिंध प्रातांत गेल्या वर्षी अनेक हिंदू मुलींचे अपहरण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत

  • Share this:

इस्लामाबाद, 27 जानेवारी : वेळोवेळी भारताने पाकिस्तावर प्रतिहल्ला करुन त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले तरी पाकिस्तानच्या कुरघोडी थांबत नसल्याचे दिसून येत आहे. अल्पसंख्यांविरोधात अद्यापही तेथे भेदभाव सुरू आहे. पुन्हा एकदा तेथील काही लोकांनी हिंदूच्या मंदिरावर (Hindu temple vandalised) हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंध प्रांतात देवी भातियानी मंदिरात तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. या महिन्यात तेथील पवित्र धर्मस्थळ ननकाना साहेब (Nankana Sahib Gurdwara) येथेही दगडफेक केली होती. ही या महिन्यातील दुसरी घटना आहे.

मूर्तीवर काळा रंग फेकला

पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी दावा केला आहे की, सिंधमधील देवी भातियानी मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन चार फोटो शेअर केले आहेत. यानुसार मूर्तीवर काळा रंग टाकण्यात आला असून तोडफोडही करण्यात आली आहे. याशिवाय मंदिर पाडण्याचाही यावेळी प्रयत्न करण्यात आला. नायला यांनी लिहिले आहे की, सिंधमध्ये आता आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे.

ननकाना साहेबमध्ये दगडफेक

या महिन्यातच पाकिस्तानातील ननकाना साहेबवर दगडफेक केल्याचा एक व्हिडिओ व्हायरला झाला होता. या व्हिडिओत एका आंदोलनकर्त्याने पवित्र शहराचे नाव बदलून गुलाम अली मुस्तफा करण्याची धमकीदेखील दिली होती. येथे लोक शीखांविरोधात नारेबाजी करीत होते. या विरोधामुळे गुरुद्वारा जन्म स्थान ननकाना साहेब येथे काही दिवसांसाठी भजन-कीर्तन रद्द करावे लागले.

जबरदस्ती धर्मांतराचा आरोप

सिंध प्रातांत गेल्या वर्षी अनेक हिंदू मुलींचे अपहरण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अपहरण केल्यानंतर त्यांचे जबरदस्ती लग्न लावून देण्यात आले. गेल्या वर्षी ननकाना साहेब येथील एका शीख मुलीचेही अपहरण करण्यात आले होते. याशिवाय तिचे जबरदस्तीने धर्मांतरण करुन तिच्यासोबत निकाह करण्याचा आरोप होता. ही मुलगी ननकाना साहेब गुरुद्वाराच्या ग्रंथीची मुलगी होती. पाकिस्तानात शीखांच्या धर्मांतरावर अनेक गोंधळ होत असल्याचे सांगितले जात आहे.

First published: January 27, 2020, 10:39 AM IST

ताज्या बातम्या