पाकिस्तानात आणखी एका मंदिरात तोडफोड, हिंदू कुटुंबांना मारहाण आणि मूर्तीही तोडल्या

पाकिस्तानात आणखी एका मंदिरात तोडफोड, हिंदू कुटुंबांना मारहाण आणि मूर्तीही तोडल्या

पाकिस्तानातील सिंध प्रांतात आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी मुस्लिम कट्टरपंथियांच्या एका जमावाने केवळ मंदिराचे नुकसान नाही केले तर हिंदू कुटुंबातील सदस्यांना देखील मारहाण केली आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 05 नोव्हेंबर: पाकिस्तानातील (Pakistan) सिंध प्रांतात अल्पसंख्यांक हिंदूंवरील हल्ले थांबायचे नाव घेत नाही आहेत. गेल्या रविवारी मुस्लिम कट्टरपंथियांच्या एका जमावाने सिंध प्रांतातील एका मंदिराची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी मंदिर परिसरात राहणाऱ्या 300 हिंदू कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला गेला. तसंच त्यांना त्याठिकाणाहून निघून जाण्याची धमकी देखील देण्यात आली. दरम्यान एकीकडे झालेल्या या  हल्ल्या दरम्यान हिंदू-मुस्लिम ऐक्य देखील पाहायला मिळालं. अशी बातमी समोर येते आहे की, याठिकाणी राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबातील सदस्यांनी हल्लेखोरांन पळवून लावले.

डॉनमधील बातमीनुसार एका मुस्लिम कट्टरपंथियांच्या जमावाने ही तोडफोड केली, हिंदूंना मारहाण करण्याचा प्रयत्न देखील केला गेला. मात्र त्याठिकाणीच्या स्थानिक मुस्लिम परिवारांनी त्यांना परिसरातून हुसकावून लावले. शीतल दास परिसरात रविवारी ही घटना घडली, याठिकाणी 300 हिंदू परिवार तर 30 मुस्लिम कुटुंब वास्तव्यास आहेत. मीडिया अहवालानुसार याठिकाणच्या शेजारी असणाऱ्या परिसरातील काही लोक शीतल दास परिसरात जाता येणाऱ्या एकमेव दरवाजाबाहेर उभे होते. यातील काही दंगलखोरांनी मारहाण सुरू केली.

(हे वाचा-बिहारमधील मोठी दुर्घटना, गंगा नदीत बोट बुडाली; 15 जण बेपत्ता

हल्ला होणार त्याआधीच त्याठिकाणी राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबातील सदस्यांना त्यांना वस्तीत घुसण्यापासून थांबवले. याठिकाणच्या एका हिंदू व्यक्तीने पाकिस्तानी वर्तमानपत्र एक्स्प्रेस ट्रिब्यूनला अशी माहिती दिली की, माहिती मिळताच काही वेळातच याठिकाणी पोलीस हजर झाले होते. आणखी एकाने माहिती दिली की जमावापैकी काही जणांनी मंदिर गाठले आणि त्यांनी तिथे तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. जमाव त्याठिकाणच्या लोकांवर हल्ला करू पाहत होता, पण पोलिसांनी त्यांना वेळीच अटकाव केला.

(हे वाचा-धक्कादायक! 5 हजारात मारहाण, 10 हजारात...तरुणाने पोस्ट केली गुंडागिरीची रेट लिस्ट)

प्रत्यक्षदर्शींनी अशी माहिती दिली आहे की, मंदिरातील तीन मूर्तींचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी देखील अशी माहिती दिली आहे की, स्थानिक मुस्लिम परिवारांनी हिंदूंवर होणारा हल्ला रोखला.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 5, 2020, 3:22 PM IST

ताज्या बातम्या