मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पाकिस्तानमध्ये धार्मिक उन्माद, मंदिराची जमावाकडून तोडफोड!

पाकिस्तानमध्ये धार्मिक उन्माद, मंदिराची जमावाकडून तोडफोड!

पाकिस्तानमध्ये (Pakistan) धार्मिक उन्मादाची (Religious Extremism) धक्कादायक घटना घडली आहे. देशातील खैबर पख्यूतनख्वाह (Khyber Pakhtunkhwa) प्रांतामध्ये शेकडो लोकांच्या जमावानं एका मंदिराची तोडफोड केली.

  इस्लामाबाद, 31 डिसेंबर : पाकिस्तानमध्ये (Pakistan) धार्मिक उन्मादाची (Religious Extremism)  धक्कादायक घटना घडली आहे. देशातील खैबर पख्यूतनख्वाह (Khyber Pakhtunkhwa) प्रांतामध्ये शेकडो लोकांच्या जमावानं एका मंदिराची तोडफोड केली. करक जिल्ह्यातील तेरी गावामध्ये ही घटना घडल्याची माहिती जिल्ह्यातील पोलीस अधिकारी इरफान मरावत यांनी दिली आहे. काय आहे घटना? या घटनेबाबत मरावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या मंदिराच्या नव्या बांधकामाला जमावाचा विरोध होता. त्यांनी मंदिराच्या नव्या बांधकामासह जुन्या भागाचीही नासधूस केली. या प्रकरणात अजून कोणत्याही व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला नाही, तसेच कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.’’ घटनेचे तीव्र पडसाद पाकिस्तानच्या मानवी आयोगाचे सचिव लालचंद माल्ही यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. काही समाजविघातक शक्ती पाकिस्तानची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारनं त्यांना थारा देऊ नये. जिल्हा प्रशासनानं याबाबत तातडीनं FIR दाखल करुन दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी,’’ अशी मागणी त्यांनी केली आहे. लंडनमधील मानधवाधिकार कार्यकर्त्या शमा जुनेजो यांनीही या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. “हा नवा पाकिस्तान आहे. इथे एका मंदिराची तोडफोड झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दलानं उन्मादी जमावाला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. हा एक लज्जास्पद दिवस आहे,’’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारचं स्पष्टीकरण काय? ही घटना व्हायरल झाल्यानंतर खैबर पख्यूतनख्वाह सरकारनं याबबत स्पष्टीकरण दिलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. धार्मिक स्थळावर करण्यात आलेले हल्ले सरकार खपवून घेणार नाही. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींना तातडीनं अटक करण्यात येईल,’’ असं आश्वासन खान यांनी दिले आहे. अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तानात 75 लाख हिंदू राहतात. तर देशातील हिंदूंची संख्या 90 लाखांपेक्षा जास्त आहे, असं त्यांच्या नेत्यांचा दावा आहे. देशातील हिंदूचा छळ करणे, त्यांच्या मुलींचं सक्तीनं धर्मांतर करणे यासारखे प्रकार पाकिस्तानमध्ये वारंवार उघडकीस आले आहेत. सिंध प्रांतामध्ये या घटनांचं प्रमाण जास्त आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Pakistan

  पुढील बातम्या