Home /News /videsh /

तालिबानच्या दहशतीखालील काबुलमध्ये ऐकू आले हिंदू भजनाचे सूर; नवरात्रौत्सव दरम्यान VIDEO VIRAL

तालिबानच्या दहशतीखालील काबुलमध्ये ऐकू आले हिंदू भजनाचे सूर; नवरात्रौत्सव दरम्यान VIDEO VIRAL

काबुलमध्ये (Kabul) राहणाऱ्या अल्पसंख्यांक हिंदूंचा हा व्हिडीओ असून या व्हिडीओमध्ये नागरिक नवरात्रीचा (Navratri) उत्सव साजरा करताना दिसत आहेत.

अफगाणिस्तान, 14 ऑक्टोबर : काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानमधून (Afghanistan) आपलं सैन्य पूर्णपणे माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानमध्ये आपलं वर्चस्व स्थापन केलं. तेव्हापासून या देशामध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झालेली आहे. लाखो नागरिकांनी तालिबानच्या भीतीमुळे असामान्य परिस्थितीमध्ये आपला देश सोडला आहे. ज्या नागरिकांनी चांगल्या भविष्याच्या आशेवर अफगाणिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे ते देखील सध्या प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये काहीसा दिलासा देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. काबुलमध्ये (Kabul) राहणाऱ्या अल्पसंख्यांक हिंदूंचा हा व्हिडीओ असून या व्हिडीओमध्ये नागरिक नवरात्रीचा (Navratri) उत्सव साजरा करताना दिसत आहेत. सध्या भारतासह जगभरातील हिंदू नागरिक नवरात्रीचा उत्सव साजरा करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये देखील काही भारतीय कुटुंब वास्तव्यास आहेत. यामध्ये प्रामुख्याने शीख लोकांचा समावेश आहे. सध्या अफगाणिस्तानमधील सामाजिक स्थिती सुरक्षित नसून त्या ठिकाणी तालिबानच वर्चस्व आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील काबुलच्या आसमाई मंदिरामध्ये अल्पसंख्यांक हिंदू समुदायाच्या लोकांनी एकत्र येऊन नवरात्रीनिमित्त भजन-कीर्तन केलं.

तालिबानी अतिरेक्यांच्या विजयाचं पुन्हा जंगी सेलिब्रेशन

मंदिरात सुरू असलेल्या 'हरे रामा-हरे कृष्णा' या भजनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तो शेअर देखील केला आहे.

जळत्या मेणबत्तीजवळ उभं राहून Deodorant लावत होता मुलगा, अचानक स्फोट झाला आणि....

पत्रकार रविंदरसिंग रॉबिन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अफगाणिस्तानातील हिंदूंचा 'हरे-रामा, हरे-कृष्णा' भजन गातानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. व्हिडीओच्या खाली त्यांनी याबाबत थोडी माहिती देखील दिली आहे. सोमवारी रात्री काबुलमधील हिंदू समुदायाने प्राचीन आसमाई मंदिरात नवरात्रीचा उत्सव साजरा केला. अफगाणिस्तानातील वाढती आर्थिक आणि सामाजिक अस्थिरता पाहता भारत सरकारने लवकरात लवकर त्यांना तेथून बाहेर काढावं, अशी विनंती देखील या हिंदूंनी केल्याच रविंदरसिंग यांनी म्हटलं आहे. ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानात अस्थिरता निर्माण झाल्यानंतर भारत सरकारने अनेक भारतीयांना मायदेशी आणलं आहे. मात्र, अजूनही त्याठिकाणी भारतीय लोक अडकलेले आहेत, हे या व्हिडीओवरून स्पष्ट होत आहे. हे भारतीय लोक आता भारत सरकारकडे मदतीची अपेक्षा करत आहेत.
First published:

Tags: Afghanistan, Navratri, Taliban

पुढील बातम्या